Pune Crime News | अनाथ अल्पवयीन मुलीशी बालविवाह करणार्‍या पतीसह 9 जणांवर खराडी पोलिसांनी दाखल केला गुन्हा, एक वर्षानंतर आला प्रकार उघडकीस

Crime

पुणे : Pune Crime News | खराडी येथील अनाथ साडेचौदा वर्षाच्या मुलीशी विवाह केल्याप्रकरणी बाल विवाह प्रतिबंधक अधिनियमान्वये पतीसह ९ जणांवर खराडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार गेल्या वर्षी २८ मार्च २०२५ रोजी घडला होता.

पती कृष्णा माधव कांबळे (वय २७, रा. चंदननगर), सुरज गणपत कांबळे (वय २६), शांताबाई गणपत कांबळे (वय ४०), अमोल गणपत कांबळे (वय २४), योगेश काकासाहेब टेकाळे (वय २१), रुक्मिणी मारुती कांबळे (वय ५०), मोनिका नरसिंग कांबळे (वय ३०), संजना मारुती कांबळे (वय ४०, सर्व रा. खराडी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत एका अंगणवाडी सेविकेने खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. खराडी भागातील एका अल्पवयीन मुलीचा २८ मार्च २०२५ रोजी एका तरुणाशी विवाह झाला होता. याबाबतची माहिती जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकार्‍यांना पत्राद्वारे मिळाले होती. त्यानंतर चाईल्ड हेल्पलाईनचे स्वयंसेवक, तसेच अधिकार्‍यांनी चौकशी केली. तेव्हा बालविवाहाचा प्रकार उघडकीस आला. या मुलीला आईवडिल नाहीत, त्यामुळे मुलगी अल्पवयीन असताना तिचा विवाह करुन दिल्या प्रकरणी एका तरुणासह त्याची आई, भाऊ, तसेच नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर या प्रकरणी बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ कलम ९, १० आणि ११ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक मीरा चव्हाण तपास करत आहेत.

You may have missed