Firing In Sahakar Nagar Pune | पुणे : सहकारनगरमध्ये जिम मालकावर बेछूट गोळीबार, जिम मालक जखमी,सुपारी घेऊन हल्ला केल्याचा संशय, सहकारनगर पोलिसांनी चौघांना घेतले ताब्यात (Video)

Firing in Sahakar Nagar, Pune | Pune: Gym owner shot at indiscriminately in Sahakar Nagar and injured; attack suspected to be a contract hit; Sahakar Nagar police have detained four individuals (Video).

पुणे : Firing In Sahakar Nagar Pune | पूर्ववैमनस्यातून जिम मालकावर दुचाकीवरुन आलेल्या चौघांनी गोळीबार करण्याची घटना तळजाई परिसरात बुधवारी रात्री उशिरा घडली. यामध्ये दोन गोळ्या लागून जिम मालक जखमी झाला असून सहकारनगर पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले आहे. आरोपी पूर्वीच्या भांडणातून गोळीबार केल्याचे सांगत आहेत. परंतु, योगेश बानेकर हे आरोपींना ओळखत नाहीत. त्यामुळे सुपारी घेऊन आरोपींनी गोळीबार केला का, या दिशेनेही पोलीस तपास करीत आहेत.

https://www.instagram.com/p/DZb3EHqpnTJ

योगेश महेश बानेकर Yogesh Mahesh Banekar (वय ३५, रा. केतकी अपार्टमेंट, सहकारनगर नंबर २) असे जखमी झालेल्या जिम मालकाचे नाव आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. सहकारनगर पोलिसांनी आदित्य विष्णु थोपटे (वय २१, रा. जनता वसाहत) याला अटक केली असून त्याच्या तीन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले आहे. ही घटना सहकारनगरमधील बिकानेर चौकात बुधवारी रात्री पावणे दहा वाजता घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी योगेश बानेकर हे जिम व्यावसायिक आहेत. ते रात्री बिकानेर चौकात फळे घेण्यासाठी थांबले होते. त्याचवेळी आदित्य थोपटे व त्याचे आणखी तीन साथीदार दुचाकीवरुन आले. त्यांनी योगेश यांच्या दिशेने ३ वेळा फायर केले. योगेश हे खाली वाकल्याने एक गोळी त्यांच्या डोक्याच्या पाठीमागील बाजूला लागली. त्यानंतर ते तेथून पळून जात असताना याला पळून जाऊ देऊ नका, याची विकेट टाकायची आहे, पकडा त्याला, असे त्यांच्यातील एकाने म्हटले. तेव्हा त्यांच्यातील एक जण योगेश यांचा पाठलाग करुन लागला. त्याने कोयत्याने योगेश यांच्या डोक्यात वार करुन गंभीर जखमी केले. योगेश बानेकर यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस सह आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त तेजस्वी सातपुते, राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त गौहर हसन, मिलिंद मोहिते यांच्यासह अनेक पोलीस अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. सहकारनगर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करुन काही वेळात आरोपींची नावे निष्पन्न केली. त्यांचा शोध घेऊन चौघांना ताब्यात घेतले आहे. पूर्वी भांडणे झाली होती. त्या कारणावरुन गोळीबार केल्याचे आरोपी सांगत आहेत. त्यांनी कोणाकडून तरी सुपारी घेऊन हा गोळीबार केल्याचा पोलिसांना संशय आहे. सहायक पोलीस निरीक्षक सोनाली मिठारे तपास करीत आहेत.

You may have missed