Pune Crime News | समीर जैन याने स्कायलाइन प्रकल्पातही परदेशी गुंतवणुकदारांची केली पावणेपाच कोटींची फसवणूक; दोन वर्षांपूर्वी दिलेल्या तक्रार अर्जावर पोलिसांनी कारवाई केली नाही

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | केसनंद येथील रविनंदा टॉवर प्रकल्पातील १५० फ्लॅटधारकांची ५ कोटी रुपयांची फसवणू केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर याच रविनंदा लँडमार्क्स याचे भागीदार समीर जैन व दैवेश रवींद्र जैन यांनी वाघोली येथील स्काय लाईटस स्किममध्ये बाय बॅक स्किममध्ये गुंतवणूक स्वीकारुन त्या बदल्यात परतावा, मुळ रक्कम, फ्लॅट/शॉप ने देता ४ कोटी ७३ लाख २३ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले होते. विशेष म्हणजे या दोन्ही गुन्ह्याचा आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास केला जात असून पोलिसांनी केवळ गुन्हा दाखल करण्याची औपचारिकता पूर्ण केली असून कोणतीही कारवाई अजूनपर्यंत केलेली नाही. रविनंदा लँड मार्क्सच्या समीर जैन व इतरांविरुद्ध दोन वर्षांपूर्वी तक्रार अर्ज दिला होता. त्यावर पोलिसांनी काहीही कारवाई केली नसल्याचे दिसून आले आहे.

रविनंदा स्काय लाईटस स्किम बाबत गेल्या महिन्यात आर्थिक गुन्हे शाखेने वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यात अनेकांकडून त्यांनी गुंतवणूक स्वीकारली होती. त्याबदल्यात त्यांना  फ्लॅट, शॉप देण्याचा करारनामा केला होता. परंतु, या गुंतवणुकदारांना करारानुसार दिलेले फ्लॅट समीर जैन, दैवेश जैन यांनी परस्पर दुसर्‍यांना विकले. अशा ८ गुंतवणूकदारांची ४ कोटी ७३ लाख रुपयांची फसवणूक केली. या गुंतवणूकदारांना फसवुन त्यांनी दुसर्‍या जे फ्लॅट विकले होते, त्यांचीही फसवणूक झाली आहे.

याबाबत फिर्यादी सुखजीत सिंग निर्मलसिंग सैनी यांनी सांगितले की, मी यापूर्वी २३ डिसेंबर २०२४ मध्ये समीर जैन व इतरांचे विरुद्ध तक्रार अर्ज दिला होता. या तक्रार अर्जातील चौकशीवेळी समीर जैन यांचा जबाब नोंद करण्यात आलेले होते. या जबाबामध्ये त्याने सांगितले होते की, त्यांना बांधकाम पूर्ण करण्याकरीता ३१ डिसेंबर २०२७ पर्यत महारेराची परवानगी आहे. तसेच हा प्रकल्प विकसित करण्याकरीता कुमार बिल्डर्स यांच्या सोबत करारनामा झाला होता. आमची क्रेडाईसोबत १४ मे २०२५ रोजी मिटींग झाली होती. या मिटींगमध्ये मी जागामालक ज्ञानेश्वर पासलकर व इतर, समीर जैन, हितेश जैन, हेमेंद्र शहा हे देखील हजार होते. या मिटींगमध्ये हा प्रकल्प विकसित करण्यासाठी कुमार बिल्डर्सला देत असल्याबाबत सांगितले होते. तसेच २३ ऑक्टोंबर २०२४ रोजी ५०० रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर रविनंदा लँडमार्क्स व कुमार बिल्डर्स यांचे प्रोजेक्ट मॅनेजमेंट करारनामा करण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी आम्ही बांधकाम सुरु करीत आहोत, असे सांगिून १ ऑक्टोंबर २०२५ रोजी बांधकाम सुरु करण्याआधी पुजा केली होती. परंतु, अद्यापपर्यंत कसले ही बांधकाम सुरु केली नाही. त्यानंतर अनेकदा समीर जैन यांच्याशी संपर्क साधण्यात आला. परंतु, त्यांनी दाद दिली नाही़ जागा मालक बांधकाम करु देत नाही, तसेच पैसे देण्याकरीता ब्लॅकमेल करीत आहे, असे मला सांगून टाळाटाळ करण्यात आल्याचे सैनी यांनी सांगितले.

रविनंदा टॉवर्स या प्रकल्पात समीर जैन याने अगोदर ४ इमारती बांधण्याचे ठरविले होते. त्यानंतर आणखी एक टॉवर उभारण्याचे ठरविण्यात आले. यामधील तब्बल २०५ जणांना त्यांनी फ्लॅट विक्री करुन जवळपास सर्व रक्कम घेतली आहे. ४२ महिन्यात फ्लॅट ताब्यात देणार होते. अनेक असताना त्याने १२ मजली इमारतीपैकी केवळ दोन इमारतीचा ७ मजल्यांपर्यंतचा स्लॅबचा सांगाडा उभारला आहे. प्रकल्पाचे काम जसे पुढे जाईल, त्याप्रमाणे कर्जाचे हप्ते बँकेकडून दिले जात होते. त्यांनी शेवटची डिमांड सप्टेंबर २०२१ मध्ये केली होती. त्यानंतर समीर जैन यांच्या रविनंदा लँडमार्क्स कंपनीकडून डिमांड करण्यात आली नाही. आम्ही वारंवार साईवर जाऊन भेट दिली असता बांधकाम बंद अवस्थेत होते. मार्केटयार्ड येथील कार्यालयात जाऊन भेट दिली असता कार्यालयही बंद आढळून आले. त्यामुळे बिल्डरकडून नुकसान भरपाई व ताबा देण्याकरीता आम्ही रविनंदा टॉवर्स एओपी (असोशिएशन ऑफ पर्सन्स) केसनंद,  या नावे असोशिएशन मार्च २०२४ मध्ये स्थापन करण्यात आली आहे. समीर जैन याने दिलेले दोन्ही मोबाईल नंबर बंद करुन ठेवले आहेत.

आम्ही समीर जैन यांना फ्लॅटच्या बांधकामासाठी पैसे दिले आहेत. त्यांनी ते कशासाठी वापरले याची आम्हाला माहिती नाही. पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करावी, अशी आमची मागणी असल्याचे सुखजितसिंग सैनी यांनी सांगितले.

You may have missed