Pune Crime News | सराईत गुन्हेगाराकडून 3 पिस्टल व 5 काडतुसे जप्त; मध्यप्रदेशातील उमरटी येथील पप्पीसिंग यांच्याकडून घेतली शस्त्रे

[16:31, 17/06/2026] Nitin Kaka: Pune Crime News | 3 pistols and 5 cartridges seized from a habitual offender; weapons procured from Pappi Singh of Umarti, Madhya Pradesh. [16:31, 17/06/2026] Nitin Kaka: seo

पुणे : Pune Crime News |  वडगाव पठार येथे थांबलेल्या दोघांकडून गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने ३ पिस्टल आणि ५ काडतुसे असा १ लाख २१ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.

प्रथमेश पंकज देसाई Prathamesh Pankaj Desai (वय २१, रा. जाधव बिल्डिंग, नर्‍हे, आंबेगाव) आणि अनिकेत आंनद केंद्रे Aniket Anand Kendre (वय ३६, रा. सिंहगड रोड, वडगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. प्रथमेश देसाई याच्यावर पर्वती आणि सिंहगड रोड पोलीस ठाण्यात यापूर्वी २ गुन्हे दाखल आहेत.

गुन्हे शाखेकडील युनिट २ चे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी, तसेच पोलीस अंमलदार हे १६ जून रोजी गुन्हे  प्रतिबंधक गस्त व पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार शिवानंद कायगुडे व उज्वल मोकाशी यांना त्यांच्या बातमीदारांकडून बातमी मिळाली की, वडगाव पठार येथे दोन संशयित थांबले असून त्यांच्याकडे हत्यार आहेत. युनिट २ च्या पथकाने सिंहगड आंबेगाव पठार येथे जाऊन छापा टाकून दोघांना ताब्यात घेतले. प्रथमेश देसाई याची झडती घेतली असता त्याच्याकडे दोन पिस्टल व ३ जिवंत काडतुसे मिळाली. अनिकेत केंद्रे याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक पिस्टल व २ जिवंत काडतुसे मिळून आली. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता मध्य प्रदेशातील उमरटी येथून पप्पीसिंग याच्याकडून ७५ हजार रुपयांमध्ये ३ पिस्टल व ५ काडतुसे स्वत:चे संरक्षणासाठी खरेदी केल्याचे त्यांनी सांगितले. सिंहगड रोड पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यात मध्य प्रदेशातील उमरटी येथून मोठ्या प्रमाणावर शस्त्र पुरवठा होत असल्याचे यापूर्वी आढळून आले होते. त्यावरुन पुणे पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी मोठा फौजफाटा घेऊन जाऊन या उमरटी गावातील अनेक घरामध्ये सुरु असलेले शस्त्र कारखाने उद्धवस्त केले होते. त्यानंतर आता हे शस्त्र कारखाने पुन्हा सुरु झाल्याचे दिसून येत आहे.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजित जाधव यांच्या सुचनेप्रमाण पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी, पोलीस अंमलदार शिवानंद कायगुडे, उज्वल मोकाशी, शंकर नेवसे, नागनाथ राख, सर्जेराव सरगर, संतोष टकले, विजयकुमार पवार, ओमकार कुंभार, शंकर कुंभार, सद्दाम तांबोळी, अजिम शेख, विनोद चव्हाण, योगेश मांढरे, संजय आबनावे, विशाल दळवी, संदिप शिर्के, ऋषिकेश व्यवहारे, साधना ताम्हाणे, विद्या शिंदे यांनी केली आहे.

You may have missed