Pune Crime News | पुणे : पूर्ववैमनस्यातून युवकाच्या कानावर बेसबॉलने मारहाण करुन खुन, गोखलेनगरमधील पहाटेची घटना

Pune Crime News | Pune: Youth murdered after being struck on the ear with a baseball bat due to an old enmity; incident occurred in Gokhalenagar at dawn.

पुणे : Pune Crime News |  पूर्ववैमनस्यातून दोन ते तीन जणांनी बेसबॉलच्या स्टीकने कानावर मारहाण करुन तरुणाचा खुन केल्याचा प्रकार समोर आला आहे.

हर्ष मच्छिंद्र जाधव Harsh Machindra Jadhav (वय २०, रा. गोखलेनगर) असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे. हर्ष जाधव हा काहीही कामधंदा करत नव्हता़ त्याच्यावर यापूर्वी मारामारीचे २ गुन्हे दाखल आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्ष जाधव हा गोखलेनगरमधील घराबाहेर रिक्षामध्ये बसला होता. पहाटे पावणे तीन, तीन वाजण्याच्या सुमारास दोन ते तीन जण आले. त्यांनी रिक्षा बसलेल्या हर्षला बाहेर ओढून त्याला बेसबॉलच्या स्टिकने मारहाण केली. त्यातील एक फटका त्याच्या कानावर बसला. कानातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होऊ लागला. ते पाहून हल्लेखोर पळून गेले.  हर्ष याच्या आरडा ओरडा ऐकून जवळच्या लोकांनी बाहेर येऊन पाहिले तर हर्ष जाधव याला लागल्याचे दिसून आले़ त्यांनी त्याला रुग्णालयात नेले़ परंतु, उपचार सुरु करत असतानाच त्याचा मृत्यू झाला.

याबाबत चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे यांनी सांगितले की, हर्ष जाधव याच्यावर हल्ला झाला, त्या परिसरात सीसीटीव्ही नाहीत. त्याच्यावर करणार्‍या दोघांची नावे निष्पन्न झाली आहेत. ते हर्ष जाधव याचे जवळचे मित्र आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

You may have missed