Pune Crime News | स्वत: ईश्वर असल्याचे सांगून महिलेवर लैंगिक अत्याचार करणार्‍या मिश्रा बाबासह 8 जणांना अटक

Pune Crime News

पुणे : Pune Crime News |  स्वत: ईश्वर असल्याचे भासवून कुटुंबाला प्रभावित केले़ त्याने सहकार्‍याच्या मदतीने राधामोहन मिश्रा याने वेळोवेळी मारहाण, शिवीगाळ करुन लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खराडी पोलिसांनी या मिश्राबाबासह आठ जणांना अटक केली आहे.

राधामोहन मिश्रा Radhamohan Mishra (वय ५०, रा. माऊली सदन, रेणुका पार्क, उबाळेनगर, खराडी), स्वामी कंवल नयन Swami Kanwal Nayan (वय ५८), किर्ती हंसराज आहुजा Kirti Hansraj Ahuja (वय ३८), कनिका हंसराज आहुजा Kanika Hansraj Ahuja (वय ३४), खुशबु गजेंदर हुडीया Khushbu Gajender Hudiya (वय ३७), श्र्वेता अवधबिहारी मिश्रा Shveta Awadhbihari Mishra (वय ३७), अमृता अवधबिहारी मिश्रा Amrita Awadhabihari Mishra (वय ३२) आणि श्र्वेता संजय पांडे Shweta Sanjay Pandey (वय २८, सर्व रा. माऊली सदन, रेणुका पार्क, उबाळेनगर, खराडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

याबाबत एका ४१ वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या मुळच्या हरियाना येथील राहणार्‍या आहेत. त्यांच्या वडिलांच्या घरी स्वामी कंवल नयन हे २००० साली काही वेळ आले होते. त्यामुळे घर सुंगधित झाले होते. त्यानंतर फेब्रुवारी २००१ स्वामी कंवल नयन याने त्यांच्या कुटुंबाची राधामोहन मिश्रा याच्याशी भेट घालून दिली. सांगितले की हे देव आहेत, त्यांचा आदर का, अनादर केला तर नरकात जावे लागेल, असे म्हणून त्यांना भिती दाखविली. त्यांचे वडिल हे राधामोहन आणि स्वामी कंवल याच्या प्रभावाखाली होते. २००३ मध्ये कुरुक्षेत्र येथे राधामोहन मिश्रा व स्वामी कंवल नयन यांनी हॉस्टेल सुरु केले. त्यामध्ये फिर्यादी यांच्या भावाचे देखील अ‍ॅडमिशन केले गेले. सेवा करण्यासाठी त्यांचे आई वडिल होस्टेलवर राहु लागले. फिर्यादी यांना राधामोहन बोलावून घेण्यास सांगत.

त्यांना तू महिलांची प्रसुती कशी होते याचे व्हिडिओ दाखवुन तू हे सहन करु शकशील का असे विचारत. त्यांनी हो सांगितल्यावर त्यांना काठीने मारहाण करत. त्या ओरडल्या की, तू माझा हलका मार सहन करु शकत नाही तर लग्नानंतर काय करशील असे सांगून तु तुझ्या मनाचा रिपोर्ट लिहून दे, त्यावर तुझ्या मनाचे विश्लेषण करेल आणि माझ्यापासून काहीही लपवु नको, नाहीतर तुला पाप लागून तू नरकात जाशील अशी भिती घातली. वडिलांनी सेक्टर ३ मध्ये बांधकाम केले. अर्ध्या भागात ते रहात अर्ध्या भागात राधामोहन होस्टेल चालवित  होता. २००९ मध्ये फिर्यादी यांना लग्न करावयाचे होते . परंतु, ते राधामोहन याला मान्य नसल्याने त्याने ती चरित्र्यहीन असून एक वेळ मारहाण केल्याशिवाय सुधारणा होणार नाही, असे म्हणून आईवडिलासमोर तिला मारहाण केली. त्यानंतर त्याने या तरुणीला २०१० मध्ये त्याच्या सेविका खुशबु हुडीया हिने खोलीत बोलावून तिला चहा पिण्यास दिला. सेविका निघून गेल्यानंतर त्याने कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

कोणाला काही सांगायचे नाही, असे म्हणून धमकावले. त्याने संपूर्ण कुटुंबाला प्रभावित केले होते. २०१० मध्ये त्याने संपूर्ण कुटुंबाला पुण्यात स्थलांतर होण्यास भाग पाडले. ते सुरुवातीला वडगाव शेरी येथे रहात होते. तेथेही त्याने या तरुणीवर अनेकदा अत्याचार केला. २०१३ मध्ये त्यांनी उबाळेनगर येथे माऊली सदन येथे रहायला आले. खालच्या मजल्यावर तिचे आई वडील, भाऊ राहायचे. वरच्या मजल्यावर त्या, मिश्रा व त्याचे शिष्य रहात होते. २०१३ ते २०१६ दरम्यान त्याने त्यांच्यावर अनेकदा अत्याचार केला. त्यांचे नग्न व्हिडिओ काढले. शॉक देणे, असे अमानुष अत्याचार केले. २०१६ मध्ये त्यांनी आईवडिलांना सांगण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मिश्रा याने ही चरित्र्यहीन असल्याचे सांगून कांगावा केला. आईवडिलांनी त्याचेच म्हणणे खरे वाटले  त्यापासून सुटका व्हावी, यासाठी या महिलेने शादी डॉट कॉमवरुन स्थळ शोधले. पालकांना विश्वासात न घेता पळून जाऊन लग्न केले.

लग्नानंतर ही मिश्रा तिला पाहिजे तसा नाचवत राहिला. त्यांच्या एकांतातील व्हिडिओ बनवायला लावले. त्याने त्याच्या मालकीची एखादी वस्तू असल्यासारखे वागवले. २०२४ मध्ये पतीपासून घटस्फोट घ्यायला लावला. २०२५ मध्ये तिला वडिलांच्या घरात चोरी करायला लावली. या सर्व बाबीला कंटाळलेल्या या महिलेने खराडी पोलिसांकडे तक्रार केली. त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन खराडी पोलिसांनी मंगळवारी रात्री उशिरा उबाळेनगर येथील माऊली सदनवर छापा घातला. तेथून पोलिसांनी हार्ड डिस्क, डिजिटल व्हिडिओ कॅसेट, डिव्हिआर, दागिने, १० जिवंत काडतुसे, मोबाईल असा एकूण २७ लाख १५ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. राधामोहन मिश्रा, स्वामी कंवल नयन यांच्यासह ८ जणांना अटक केली. त्यांना सायंकाळी न्यायालयात हजर केले होते. आरोपींच्या वतीने अ‍ॅड. विजयसिंह ठोंबर, अ‍ॅड. निवृत्ती कराड आणि अ‍ॅड. सुधीर शाह यांनी काम पाहिले. राधामोहन मिश्रा आणि फिर्यादीचे वडील आणि भाऊ यांच्यासोबत मालमत्तेबद्दल वाद आहेत. दिवाणी कोर्टात हे वाद प्रलंबित आहेत. केवळ ते टाळण्यासाठी तब्बल १८ वर्षापूर्वी अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच महिलांना प्रथम ताब्यात घेऊन नंतर मध्यरात्री कोर्टाची परवानगी दिशाभूल करुन मिळवली असल्याचे ही अटक बेकायदेशीर असल्यामुळे उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे आरोपीचे वकील विजयसिंह ठोंबरे यांनी सांगितले.

आरोपीविरुद्ध जादुटोणा कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी अश्लिल व्हिडिओ चित्रिकरण केले आहे का, याचा तपास करायचा आहे. अशा प्रकारे आणखी काही महिलांचे लैंगिक शोषण केले आहे का, याचा तपास करायचा असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यावर न्यायालयाने २० जूनपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली.

You may have missed