Pune Crime News | रेकॉर्डवरील गुन्हेगारावर MPDA कायद्यान्वये कारवाई; नागपूर कारागृहात केले स्थानबद्ध
पुणे : Pune Crime News | दरोड्याचा प्रयत्न, खुनाचा प्रयत्न, अग्निशस्त्र बाळगणे असे गुन्हे करुन लोकांमध्ये दहशत निर्माण केलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगारावर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी एमपीडीए कायद्यान्वये कारवाई करुन त्याची नागपूर कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध केले आहे. (Pune Police MPDA Action)
अमन अंबीर झारेकरी Aman Ambir Zharekari (वय २२, रा. महालक्ष्मी बिल्डिंग, दांडेकर पुल, सिंहगड रोड) असे या रेकॉर्डवरील गुन्हेगाराचे नाव आहे.
अमन झारेकरी याच्यावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न करणे, अग्निशस्त्र बाळगणे, खुनाचा प्रयत्न करणे, बेकायदेशीर जमाव जमवुन दुखापत करणे, तोडफोड करुन लोकांमध्य दहशत निर्माण करणे असे ६ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली तरी त्याची गुन्हेगारी वृत्ती कमी झाली नाही़, त्यामुळे सिंहगड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांनी एमपीडीए कायद्यान्वये कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना पाठविला होता. त्यांनी या प्रस्तावाची पडताळणी करुन अमन झारेकरी याला एक वषार्साठी नागपूर कारागृहात स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला. त्यानुसार अमन झारेकरी याची नागपूर कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त डॉ. सागर कवडे, सहायक पोलीस आयुक्त विजय कुंभार, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर, पोलीस निरीक्षक समीर गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर, पोलीस हवालदार पंकज देशमुख, पोलीस अंमलदार अरविंद धावडे यांनी केली आहे.
