Pune Rural Police | एकाच रात्री पाच ठिकाणी दरोडा टाकणारी टोळी जेरबंद; दरोडा, जबरी चोरी, घरफोडीचे 20 गंभीर गुन्हे उघडकीस आणून ग्रामीण पोलिसांनी 25 लाखांचा माल केला जप्त

Pune Rural Police | Gang arrested for committing robberies at five locations in a single night; Rural Police solve 20 serious cases including robbery, forcible theft, and housebreaking and seize property worth ₹25 lakh.

पुणे : Pune Rural Police | एकाच रात्री चार ठिकाणी दरोडा टाकून लोकांना मारहाण करुन लुटालुट करणार्‍या व दौंड, बारामती, जुन्नर परिसरात एकसारख्या पद्धतीने गुन्हे करणार्‍या दरोडेखोरांच्या टोळीला ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केले आहे.

गणेश मंगेश काळे (वय २२, रा. कुळधरण, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर), विशाल हंबरड्या काळे (वय २१, रा. चिखली, ता. आष्टी, जि. बीड), किशोर रावण भोसले (वय १९, रा. बाभुळगाव खालसा, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्या एका अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले आहे.

गेल्या सहा महिन्यांपासून दौंड, बारामती, जुन्नर परिसरात एक सारख्या गुन्हे कार्यपद्धतीचा अवलंब करुन जबरी चोरीच्या घटना घडल्या होत्या. नागरिकांना मारहाण करणे, वाटसरुंना हत्याराचा धाक दाखवुन लुटणे असे गुन्हे घडले होते. दौंड येथे १० जून रोजी एकाच रात्रीत चार ठिकाणी आणि श्रीगोंदा येथे एका ठिकाणी दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडे टाकले होते. याबाबत पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी स्थानिक गुन्हे शाखेची बैठक घेऊन सहा पथके तयार केली. २०२६ मधील गुन्ह्याचा आढावा घेतला. या सर्व गुन्ह्यांची माहिती संकलित करुन साक्षीदार, फिर्यादी यांच्याशी संवाद साधून गुन्ह्यातील आरोपीचे वर्णन घेण्यात आले. घटनास्थळापासून सुमारे ५० किमी पर्यंत  रस्त्यालगत असणारे सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. हे फुटेज तपासल्यानंतर हे आरोपी अहिल्यानगर जिल्ह्यातून गुन्हा करण्यासाठी आले व पुन्हा अहिल्यानगरकडे गेले असल्याचे दिसून आले.

स्थानिक गुन्हे शाखा तपास करीत असताना १३ जून रोजी त्यांना हे सराईत आरोपी असून गणेश काळे, विशाल काळे, किशोर भोसले, प्रविण भोसले व त्यांचे इतर साथीदारांनी हे गुन्हे केल्याची खात्री झाली. त्यांच्यावर यापूर्वी सशस्त्र दरोडा, जबरीचे अनेक गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले होते. ते घरात न राहता, शेतात, माळावर, वीट भट्टीवर वेषांतर करुन राहतात, अशी माहिती मिळाली. त्या अनुषंगाने रात्रभर तपास करुन पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले. चौकशीमध्ये या चौघांनी इतरांच्या मदतीने दौंड मधील ४ दरोडे, माळेगाव २, जेजुरी, जुन्नर, आळेफाटा, बारामती तालुका या ठिकाणी ६जबरी चोरीचे गुन्हे तसेच यवत येथे ४ घरफोडी, दौंड येथे घरफोडीचे एक असे एकूण १५ गुन्हे उघडकीस आले आहेत. या आरोपीकडून तपासादरम्यान १७ तोळ्याचे सोन्याचे दागिने, ३२४ ग्रॅम चांदीचे दागिने व इतर माल असा एकूण २५ लाख रुपयांचा माल जप्त केला आहे.

त्याचप्रमाणे या टोळीने अहिल्यानगर जिल्ह्यातील मिरजगाव येथील २ दरोडे, कर्जत येथील एक व मिरजगाव येथील जबरी चोरीचे ३ गुन्हे आणि घरफोडीचे २ गुन्हे उघडकीस आणले आहेत. गणेश काळे याच्यावर यापूर्वी दरोडा व चोरीचे ८ गंभीर गुन्हे दाखल आहेत. विशाल काळे याच्यावर यापूर्वी २ गुन्हे आणि किशोर भोसले याच्या एक आणि प्रविण भोसले याच्यावर ११ गुन्हे दाखल असून तो सध्या फरार आहे.

ही कामगिरी विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा  यांच्या मार्गदर्शनाखाली  पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार, गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी बापुराव दडस, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, माळेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ, स्था.गु.शा. चे पोलीस उपनिरीक्षक  अभिजीत सावंत, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब कारंडे, स्था. गु. शाखेचे पोलीस अंमलदार, शिवाजी निकम, असिफ शेख, सचिन घाडगे, किशोर तेलंग, योगेश नागरगोजे, राजू मोमीण, गणेश धनवे, संतोष भापकर, सुभाष राउत, गुरूनाथ गायकवाड, विकास कापरे, सुलतान डांगे, रईस मुलाणी, तुषार चव्हाण, गणेश डेरे, धिरज जाधव, तुषार भोईटे, स्वप्निल अहीवळे, अजय घुले, गणेश होळकर, गुलाब पाटील, शैलेश स्वामी, राहुल पवार, समाधान नाईकनवरे, मपोहवा सुजाता कदम, भाउसाहेब पुंड अजय देडे, दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अब्दुल बिद्री, रुपेश कदम, पोलीस अंमलदार नितीन बोराडे, धनंजय गाढवे, पवन माने, गोरख हजारे, सागर म्हेत्रे, रमेश चितारे, संतोष भोसले, सचिन साप्ते, ओमराज कुमकुटे, महेंद्र लोहार, सोमनाथ चाँडे, किरण पांढरे, संजय कोठावळे,  पोलीस अंमलदार वैशाली बनसोडे, काजल शिंदे, ऊरूळी कांचन पोलीस ठाण्याचे सचिन जगताप, प्रविण चौधर यांनी केली आहे.

You may have missed