Police Navnath Shinde Dismissed । पुणे : अंमली पदार्थ विक्रेत्यांशी संबंध ! अवैध धंद्यावरुन वसुली करणारा पोलीस अंमलदार पोलीस सेवेतून बडतर्फ, अवैध धंद्याशी संबंध ठेवण्याविरोधात पोलीस आयुक्तांची कठोर कारवाई

Police officer Navnath Shinde dismissed. Pune: Connection with drug dealers! A police officer who was collecting money from illegal businesses has been dismissed from the police service, strict action by the Police Commissioner against maintaining ties with illegal business.

पुणे : Police Navnath Shinde Dismissed । स्वारगेट पोलीस ठाण्यात नेमणूक असताना सहकारनगर पोलीस ठाण्यातील अवैध धंद्यांना प्रोत्साहन देऊन त्यांच्याकडून हप्ता वसुली करणे तसेच अंमली पदार्थ विक्री करण्यांना मदत करणार्‍या पोलीस अंमलदाराला अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे यांनी पोलीस सेवेतून काढून टाकले आहे.

नवनाथ कांताराम शिंदे (Navnath Kantaram Shinde) असे या पोलीस अंमलदाराचे नाव आहे. शिंदे हा स्वारगेट पोलीस ठाण्यात नेमणूकीला होते.
सध्या पोलीस मुख्यालयात नेमणूकीला होते.नवनाथ शिंदे  स्वारगेट पोलीस ठाण्यात नेमणूकीला असताना गांजा विकणार्‍याचे सोबत संबंध  व संपर्क ठेवून होते.

सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंदे चालविण्यास प्रोत्साहन देणे, त्यातून स्वत:साठी आर्थिक लाथ मिळविणे, असे गैरवर्तन केल्याने त्यांना निलंबित करुन चौकशी सुरु करण्यात आली होती.

विभागीय चौकशीत नवनाथ शिंदे याचे अवैध धंदे असणार्‍यांशी संबंध होते. तसेच त्यांच्याकडून तो नियमित हप्ता घेत असल्याचे साक्षीदारांनी जबाबात नमूद केले. शिंदे यांच्या मोबाईलमध्ये अवैध धंदेचालकांचे मोबाईल जतन केल्याचे दिसून आले. पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी सुरुवातीला २१ ऑगस्ट २०२५ रोजी शिंदे याला निलंबित केले होते. सहायक पोलीस आयुक्त यांनी २३ सप्टेंबर २०२५ मध्ये सादर केलेल्या चौकशी अहवालात शिंदे हे गांजाचा अवैध धंदा करणार्‍या आरोपीच्या संपर्कात राहून आरोपींकडून दर महिन्याला पैसे घेऊन अवैध धंद्यांवरुन वसुली करीत असल्याचे दिसून आले होते. विभागीय चौकशीचा अहवालात दोषी ठरविण्यात आल्याने पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी नवनाथ शिंदे यांना पोलीस सेवेतून काढून टाकण्याची शिफारस केली. या सर्व चौकशीचे अवलोकन केल्यानंतर अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे यांनी पोलीस अंमलदार नवनाथ शिंदे याला पोलीस सेवेतून काढून (बडतर्फ) टाकले आहे.

अंमली पदार्थ तसेच अवैध धंद्यांविरोधात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गेल्या अडीच वर्षांपासून विशेष मोहिम राबवत आहेत. यापूर्वी अवैध धंद्यांना आश्रय देणार्‍यांवर त्यांनी कठोर कारवाई केली आहे. या कारवाईतून अशा अवैध धंद्यांना प्रोत्साहन देणार्‍या सर्व पोलिसांना त्यांनी या कारवाईद्वारे इशारा दिला आहे.

You may have missed