Pune Crime News | तडीपार आदेशाचा भंग करणाऱ्या तीन सराईतांना पुणे पोलिसांकडून अटक

Pune Crime News | Three experts who violated probation order arrested by Pune police

पुणे : Pune Crime News | शहर आणि जिल्ह्यातून तडीपार करण्यात आल्यानंतरही आदेशाचा भंग करून पुण्यात परतलेल्या तीन सराईतांना पोलिसांनी वेगवेगळ्या कारवायांत पकडले. मंडईतील वाहनतळ, जांभुळवाडी तलाव परिसर आणि येरवडा भागात या कारवाया करण्यात आल्या.

पहिल्या कारवाईत विश्रामबाग पोलिसांनी महात्मा फुले मंडई परिसरातून साहिल रफीक कलादगी Sahil Rafique Kaladagi, वय २४, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी, याला अटक केली. सहायक पोलीस फौजदार अविनाश इंगळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसऱ्या कारवाईत आंबेगाव पोलिसांनी जांभुळवाडी तलाव परिसरातून तुषार कृष्णा कुचेकर Tushar Krishna Kuchekar, वय २१, रा. शनीनगर, कात्रज, याला ताब्यात घेतले. तडीपार आदेशाचा भंग केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

येरवडा परिसरातील तारकेश्वर मंदिराजवळ शशी पांडू चव्हाण Shashi Pandu Chavan, वय ४३, रा. सेवालाल चौक, येरवडा, याला पोलिसांनी पकडले. त्याला शहरातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होते.

गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या सराईतांना निश्चित कालावधीसाठी पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्याच्या हद्दीतून तडीपार केले जाते. या कालावधीत संबंधितांना अधिकृत परवानगीशिवाय या परिसरात प्रवेश करण्यास बंदी असते.

You may have missed