Pimpri Crime News | पिंपरी: पोदार शाळेतील सुरक्षारक्षकाच्या मृत्यूप्रकरणी प्राचार्यासह शाळा प्रशासनाविरुद्ध गुन्हा दाखल

Pimpri Crime News | Pimpri: Case filed against the school principal and administration over the death of a security guard at Podar School

पिंपरी: Pimpri Crime News | ताथवडे येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्य प्रवेशद्वाराचा लोखंडी गेट अंगावर पडून सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाल्याप्रकरणी शाळा प्रशासनाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना ३१ जुलै रोजी सकाळी सुमारे ८ वाजता घडली. पोलिसांच्या माहितीनुसार, मुख्य प्रवेशद्वाराची वेळोवेळी दुरुस्ती आणि योग्य देखभाल न केल्यामुळे लोखंडी गेट कमकुवत झाला होता.

पोलीस उपनिरीक्षक राजू पांढरे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोदार इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य, शाळा प्रशासन तसेच गेटच्या सुरक्षिततेची आणि देखभालीची जबाबदारी असलेल्या संबंधित व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुरक्षारक्षक संजय नागनाथ कांबळे, रा. अशोकनगर, ताथवडे, हे गेट उघडत असताना तो त्यांच्या अंगावर कोसळल्याचे पोलिसांनी सांगितले. या दुर्घटनेत त्यांना गंभीर दुखापत झाली होती. उपचार सुरू असताना २ ऑगस्ट रोजी त्यांचा मृत्यू झाला.

सुरुवातीला या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. पुढील तपासानंतर संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

You may have missed