Pune Crime News | तरुणीचा विनयभंग करणार्‍या आध्यामिक गुरु दिव्य परमार याला कोंढवा पोलिसांनी केली अटक; विनयभंगाबरोबरच जादुटोणा प्रतिबंध कलमाखाली गुन्हा दाखल  

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटीच्या नावाखाली तरुणीकडे तिचे अर्धनग्न फोटोची मागणी करुन तिचा विनयभंग करणार्‍या आध्यामिक गुरुला कोंढवा पोलिसांनी अटक केली.

दिव्य जितेंद्र परमार Divya Jitendra Parmar (वय २३, रा. पार्श्वनगर सोसायटी, कोंढवा बुद्रुक) असे त्याचे नाव आहे. न्यायालयाने अधिक तपासासाठी २ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे.

याबाबत एका तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दिव्य परमार हा सोशल इन्फ्लुएंसर आहे. त्याच्याकडे अनेक जण मानसिक शांतीसाठी येत असतात. तो लोकांना व्याख्यानातून जीवनाकडे सकारात्मक पाहण्यासाठी संदेश देत असतात. ही तरुणीही त्यांच्याकडे जात होती. तेव्हा दिव्य परमार याने फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटीचे नावाखाली तुझ्या शरीरामध्ये निगेटिव्ह एनर्जी गेलेली आहे. ती काढण्यासाठी तुझे अर्धनग्न फोटो पाठव, अशी मागणी केली. फिर्यादी यांना भीती दाखवून तिचे अर्धनग्न फोटो मोबाईलद्वारे मागवुन घेतले. या तरुणीच्या तक्रारीवरुन कोंढवा पोलिसांनी विनयभंग तसेच जादुटोणा प्रतिबंध कायद्याखाली गुन्हा दाखल करुन दिव्य परमार याला अटक केली आहे.

त्याचा मोबाईल व लॅपटॉप जप्त केला आहे. कोंढवा पोलीस अधिक तपास करीत आहेत.

You may have missed