Pune Crime News | कोंढव्यात अंमली पदार्थ विरोधी टाक्स फोर्सची मोठी कारवाई ! पोलिसांसमोर केली जात होती विक्री, अंमली पदार्थ विक्री करणार्यासह सेवन करणारे 43 जणांना घेतले ताब्यात
पुणे : Pune Crime News | कोंढव्यात अंमली पदार्थ विरोधी टाक्स फोर्सने पहाटे मोठी कारवाई केली आहे. अंमली पदार्थांची विक्री करणार्या दोन सराईत गुन्हेगाराला पकडून त्यांच्याकडे अंमली पदार्थ विकत घेण्यासाठी आलेल्या ४३ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १४ दुचाकी, तिनचाकी गाड्या, ३५ मोबाईल तसेच २६ हजार ९६० रुपयांचे रोकड आणि ३ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.
अजु अहमद शेख Aju Ahmed Shaikh (रा. कोंढवा) आणि गणेश सिद्धु पाटोळे Ganesh Sidhu Patole (रा. बुद्धविहार सोसायटी, कोंढवा) असे हे अंमली पदार्थांची विक्री करणारे सराईत गुन्हेगार आहे. गणेश पाटोळे ला अजु शेख याच्याकडे केवळ ५०० रुपये पगारावर कामाला आहे. त्यांच्यावर यापूर्वी एनडीपीएसचे २ गुन्हे दाखल आहेत. त्यात २०० ग्राम गांजा बाळगल्याच्या कारणावरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स यांना कोंढव्यात अंमली पदार्थांची विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली. त्यावरुन पोलिसांनी काकडे वस्तीतील शिवनेरी गल्लीतील दर्ग्याजवळ सापळा रचला. तेथे अज्जू भाई व गणेश पाटोळे हे आले होते. त्यांच्याकडे ३ किलो गांजा आढळला. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. वेशांतर केलेले पोलीस या दोघांबरोबर तेथे उपस्थित होते. ५०० रुपये, १ हजार रुपयांचा गांजा विकत घेण्यासाठी ते तेथे पहाटेपासून येत होते. त्यांनी गांजाची मागणी केल्यानंतर पोलीस त्याला बाजूला घेऊन ताब्यात घेत होते. अशा प्रकारे तब्बल ४३ जण गांजा विकत घेण्यासाठी तेथे आले होते.
ही कारवाई अंमली पदार्थ टास्क फोर्स महाराष्ट्राच्या पुणे पथकाचे प्रमुख ज्योतिप्रिया सिंह, पोलीस उपमहानिरीक्षक प्रविण पाटील, पोलीस उपायुक्त अनुज तारे, पोलीस उपअधीक्षक नंदिनी वग्यानी, तावसकर, पोलीस उपनिरीक्षक आशिष सरवदे, सहायक फौजदार तुपे, पोलीस हवालदार कळसकर, पोलीस अंमलदार ढेभे, साबळे, होळकर यांनी केली आहे.
