Pune Crime News | तरुणाचे अपहरण करुन मारहाण करुन लुटणार्‍या सराईत 6 दरोडेखोरांना गुन्हे शाखेच्या युनिट 4 च्या पथकाने केले जेरबंद

Pune Crime News | Six experienced robbers who kidnapped, beat, and looted a young man were nabbed by Unit 4 of the Crime Branch.

पिंपरी/ पुणे : Pune Crime News | मोटारसायकलवरुन जाणार्‍या तरुणाचे रिक्षातून आलेल्या दरोडेखोरांनी अपहरण करुन त्यांना मामुर्डी येथे घेऊन गेले. तेथे त्यांना मारहाण करुन लुटणार्‍या ६ दरोडेखोरांना पिंपरी चिंचवड पोलीस दलातील गुन्हे शाखेच्या युनिट ४ च्या पथकाने जेरबंद केले आहे.

सुरज शंकर चलवादी Suraj Shankar Chalvadi (वय २४, रा. सिद्धार्थनगर, मामुर्डी, ता. हवेली), दीपक दयानंद भंडगे Deepak Dayanand Bhandge (वय २४, रा. दादांची पुण्याई, नर्‍हे), अविनाश अरुण वानखेडे Avinash Arun Wankhade (वय २६, रा. झील चौक, नर्‍हे, मुळ रा. दापोडी, वेल्हे), प्रथमेश ऊर्फ प्रतिक हरीभाऊ कंक Prathamesh alias Pratik Haribhau Kank (वय २७, रा. नर्‍हे, मुळ रा. वेल्हे), विराज ऊर्फ सनी युवराज हिरवे Viraj alias Sunny Yuvraj Hirve (वय १९, रा. सिद्धार्थनगर, मामुर्डी), ईसाक राजू काजापूरम Isaac Raju Kajapuram (वय २८, रा. सिद्धार्थनगर, मामुर्डी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली रिक्षा व मोबाईल असा १ लाख ८० हजार रुपयांचा माल जप्त केले आहे. हे आरोपी सराईत असून त्यांच्यावर यापूर्वी दरोडा, जबरी चोरी यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

फिर्यादी हे २१ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजता गहुंजे येथील लोढा सोसायटी येथे ऑर्डर देऊन झेप्टो स्टोअरचे समोरुन गहुंजे स्टेडियम येथून मोटारसायकलवरुन जात असताना डिलिव्हरी बॉय याला रिक्षामधून आलेल्यांनी रिक्षा आडवी घालून थांबवले. त्यांना रिक्षामध्ये घालून अपहरण करुन त्यांना मामुर्डी येथील स्मशानभूमी जवळील मैदानात नेले. त्यांना मारहाण करुन त्यांच्याकडील ९० हजार रुपयांची रोकड जबरदस्तीने चोरुन नेली. तळेगाव दाभाडे पोलिसांनी दरोड्याच्या गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हा शाखा युनिट ४ चे पथक करत होता. आरोपींविरुद्ध कोणताही पुरावा मिळून येत नव्हता. या पोलिसांनी घटनास्थळापासून मामुर्डीपर्यंतच्या सीसीटीव्हीचे फुटेज चेक केले़ रिक्षाचा नंबर मिळवण्याचा प्रयत्न केला. संशयितांचे सीडीआर असा तांत्रिक विश्लेषण तसेच गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे या ६ सराईतांना पकडले. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली रिक्षा व मोबाईल असा १ लाख ८० हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. पुढील कारवाईसाठी त्यांना तळेगाव दाभाडे पोलिसांच्या हवाली केले आहे.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त रोहिदास पवार, सहायक पोलीस आयुक्त डॉ़ सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन घोडेपाटली, सहायक पोलीस निरीक्षक श्रीधर भोसले, पोलीस अंमलदार राजाराम लोणकर, महेश वायबसे, अमोल बोराटे, गणेश महाडीक, संतोष असवले, सचिन मोरे, गणेश सोनटक्के, अंजनराव सोडगीर, रामदास मेरगळ, शेखर खराडे, अमोल वेताळ, अमोल माटे, बाबाराजे मुंढे, दयानंद खेडकर, संदिप सुखदाणे, सचिन नागरे, प्रशांत सोनवणे, तांत्रिक विश्लेषक त्रिनयन बाळसराफ, पोलीस हवालदार नागेश माळी आणि ननावरे यांनी केली आहे.

You may have missed