Pune Cyber Crime | पुणे : स्नॅप चॅटवर मैत्री करुन क्रिप्टोद्वारे फसवणूक ! ‘प्रिन्सिका जोशी’चा पोलिसांकडून पर्दाफाश; ‘ती’ नसून ‘तो’ निघाला, पर्वती परिसरातील कुणाल अदमाने याने मुलीचा आवाज काढून गंडविले

Pune Cyber Crime | Pune: Got friendly on Snapchat and scammed through crypto! 'Prinsika Joshi' exposed by the police; turned out it wasn't 'her' but 'him', Kunal Admane from Parvati area deceived girls by mimicking their voices

पुणे : Pune Cyber Crime |  स्नॅप चॅटवर प्रिन्सिका जोशी बनून तिने मैत्री केली. त्यातून त्याला क्रिप्टोमध्ये चांगला फायदा मिळतो, म्हणून गुंतवणूक करण्यास भाग पाडले. या फसवणूकीचा माग काढताना सायबर पोलिसांनी त्या प्रिन्सिका जोशीचा पर्दाफाश केला आहे.  ‘ती’ तरुणी नसून ‘तो’  असल्याचे समोर आले आहे.

कुणाल जितेंद्र अदमाने Kunal Jitendra Admane (वय २५, रा. पर्वती परिसर) असे त्याचे नाव आहे. कुणाल अदमाने चा तब्बल ६ ते ७ महिने स्नॅप चॅटवर चॅटिंग तसेच मोबाईल फोनवरुन नियमित संवाद सुरू होता.

तक्रारदार यांच्या स्नॅपचॅट खात्यावर प्रिन्सिका जोशी नावाच्या मुलीच्या नावाने फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. ही रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर तक्रारदार व या स्नॅपचॅट वापरकर्ता यांच्यामध्ये मैत्री निर्माण झाली. त्यानंतर ते तब्बल ६ ते ७ महिने स्नॅपचॅटवर चॅटिंग तसेच मोबाईल फोनवरुन नियमित संवाद सुरु होता. मैत्रीचा विश्वास संपादन केल्यानंतर या ‘प्रिन्सिका जोशी’ हिने तक्रारदार यांना क्रिप्टो करन्सी मध्ये पैसे गुंतवल्यास मोठा आर्थिक फायदा व आकर्षक परतावा मिळतो, असे सांगितले. त्यावर विश्वास ठेवून तक्रारदार यांनी वेळोवेळी त्यांच्या क्रिप्टो वॉलेटमधून तिच्या क्रिप्टो वॉलेटमध्ये १४६८ युएसडीटी अंदाजे दीड लाख रुपये इतकी रक्कम ट्रान्सफर केली.  काही कालावधीनंतर तक्रारदार यांनी क्रिप्टो करन्सी मध्ये झालेली वाढ गुंतवणुकीचा परतावा व पैसे परत मिळण्याबाबत वारंवार विचारणा करण्यास सुरुवात केली. त्यानंतर ‘प्रिन्सिका जोशी’ या नावाने संपर्क साधणार्‍या तरुणीने आपले स्नॅपचॅट, इन्स्टाग्राम अकाऊंट बंद केले. तसेच संपर्क टाळण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांना आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

या क्रिप्टो करन्सी फसवणूक गुन्ह्याची पद्धत अत्यंत वेगळी असल्याने सायबर पोलिसांकडून उपलब्ध स्पॅनचॅट आयडी, मोबाईल क्रमांक तसेच उपलब्ध तांत्रिक माहितीचे विश्लेषण करण्यात आले. त्यात कुणाल अदमाने हा मुख्य आरोपी असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली. तक्रारदाराने फसवणूक करणारी ‘प्रिन्सिका जोशी’ नावाची मुलगी असल्याचे नमूद केले होते. इथे पुरुष आरोपी असल्याचे दिसत होते. पोलिसांनी कुणाल अदमाने याला ताब्यात घेऊन सखोल  चौकशी केली. तेव्हा ‘प्रिन्सिका जोशी’ नावाची तरुणी प्रत्यक्षात नव्हती. तोच ‘प्रिन्सिका जोशी’ बनून तक्रारदार याच्याशी मुलीच्या आवाजात संभाषण करत असल्याचे निष्पन्न झाले. आरोपी हा उच्च शिक्षित असून हॉटेल मॅनेजमेंट केलेले आहे. कुणाल अदमाने याला अटक केली आहे.

त्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मुलीची बनावट ओळख निर्माण करुन आणखी किती व्यक्तींना आपल्या जाळ्यात ओढले आहे, याची चौकशी करण्यात येत आहे.

ही कारवाई पोलीस उपायुक्त विवेक मासाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे, पोलीस निरीक्षक शरद शेळके यांच्या सुचनांप्रमाणे पोलीस अंमलदार कृष्णकांत देसाई, बाळासो चव्हाण, जान्हवी बढेकर, रवींद्र साळवे, संदीप मुंढे, संदीप कारकुड, सुप्रिया होळकर, कृष्णा मारकड, श्रीकृष्ण नागटिळक, सोनाली चव्हाण यांनी केली आहे.

You may have missed