Pune Crime News | स्पर्धा न घेताच प्रमाणपत्रे मिळवुन 60 खेळाडुंनी मिळवली शासकीय नोकरी ! कुराश असोएिशनचे अध्यक्ष, सचिव यांना अटक, एजंटासह क्रीडा अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल

Pune Crime News | 60 players got government jobs by getting certificates without taking the exam! Chairman and secretary of the Kurash Association arrested, case filed against sports officials along with agents

पुणे : Pune Crime News | कोणतीही स्पर्धा न खेळता मागील तारखेने स्पर्धा घेतल्याचे दाखवुन त्यात पहिला, दुसरा, तिसरा क्रमांकाने प्रविण्य मिळविलेले प्रमाणपत्र घेऊन त्या आधारे खेळाडु आरक्षणातून जवळपास ६० जणांनी शासकीय नोकरी मिळविल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेने फसवणूकीचा गुन्हा दाखल करुन कुराश असोसिएशनचे अध्यक्ष व सचिवांना अटक केली आहे़ या सर्व खेळाडुंना या खेळाचे बनावट प्रमाणपत्र देणारे जिल्हा संघटक, एजंट, क्रीडा अधिकारी यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे.

कुराश असोशिएशनचे अध्यक्ष अंकुश विठ्ठल नागर Ankush Vitthal Nagar (वय ४०, रा. चंदीगड, मुळ रा. कापडबाजार, अहिल्यानगर), सचिव  शिवाजी जयवंत साळुंखे Shivaji Jaywant Salunkhe (वय ४६, रा. गंगानगर, फुरसुंगी व कोल्हापूर)  अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. न्यायालयाने यांना ८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.

कल्याण बालासाहेब मुरकुटे Kalyan Balasaheb Murkute (वय ३८, रा. माकणी, ता. गंगाखेड, जि. परभणी), चांदपाशा लालासाहेब शेख Chandpasha Lalasaheb Shaikh (वय ३३, रा. कुन्हाळी, ता. उमरगा, जि. धाराशिव) तसेच कुराश जिल्हा संघटनाचे इतर जिल्ह्याचे संघटक, कुराश खेळाचे खोटी प्रमाणपत्र प्राप्त करणारे सर्व खेळाडु, सर्व खेळाडुंना प्रमाणपत्र मिळवुन देणारे एजंट, शासकीय सक्षम क्रीडा अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक माणिकराव लगड यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार २०१६ पासून सुरु होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेकडे याबाबत तक्रार अर्ज आला होता. पोलीस भरतीसाठी कुराश व ड्रॅगनबोट या खेळांचे खोटे दाखले, मिळवुन त्याद्वारे पोलीस भरती झालेले आहेत, अशी माहिती प्राप्त झाली. त्याची चौकशी करत असताना कुराश खेळाच्या बनावट प्रमाणपत्राबाबत बीडमधील एका तरुणाने बालेवाडी येथील क्रीडा आयुक्तालयाचे कार्यालयातून माहिती अधिकार कायद्याचा वापर करुन कागदपत्रे  पोलिसांना मिळाली. त्यात कुराश असोशिएशनचे अध्यक्ष अंकुश नागर व सचिव शिवाजी साळुंखे यांची नावे नमूद आहेत. तसेच त्यामध्ये जिल्हा स्तरावरील कुराश असोसिएशनने राज्यस्तरीय कुराश असोसिएशनला पाठविलेल्या शिफारस पत्रांमध्ये बरचसे बनावटीकरण आढळून आले . त्यात प्रामुख्याने धाराशिव (जुने उस्मानाबाद) आणि छत्रपती संभाजीनगर (जुने औरंगाबाद) या जिल्ह्याचे नवे नामकरण २४ फेब्रवारी २०२३ रोजीच्या अधिसुचनेनुसार झाले आहेत. ते १५ सप्टेंबर २०२३ पासून लागू झाले आहे. त्याअगोदर २०२१ -२०२२ व ३० व ३१ मार्च २०२२२ रोजी कुराश असोशिएशन छत्रपती संभाजीनगर यांनी पार्टीशिपेशन लेटरहेडवर २४ मार्च २०२२ रोजी शिफारस केलेल्या स्पर्धकांची यादी व कालावधीमध्ये छत्रपती  संभाजीनगर, जिल्ह्याचे नाव, औरंगाबाद जिल्हा असे नाव होते. अधिसुचनेनुसार नवे नाव लागू होण्याअगोदरच्या कालावधीतील पार्टीशिपेशन लेटरवर औरंगाबाद जिल्हा कुराश असोशिएशन या नावाने पार्टिसिपेशन लेटर असणे आवश्यक होते.

या दोन्ही पत्रावरुन ही पत्रे जिल्ह्याची नावे बदलल्याची अधिसूचना लागू झाल्यानंतर म्हणजे १५ सप्टेंबर २०२३ नंतर बनविण्यात आल्याचे दिसून येते. त्यावरुन या स्पर्धेत स्पर्धकांनी भाग न घेता त्यांची नावे स्पर्धेत टाकून त्यांना या खेळाचे प्राविण्याचे प्रमाणपत्र वाटप केल्याचे दिसून येते. याचप्रमाणे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये स्पर्धेचे आयोजन केले नसतानाही तेथे आयोजन करण्यात आल्याचे दाखवून त्यात सहभागी झाल्याचे प्रमाणपत्र खेळाडुंना देण्यात आली आहे. अशी जवळपास ५०० ते ६०० प्रमाणपत्रे वाटण्यात आली आहे. या प्रमाणपत्रांचा वापर करुन पोलीस दलासह विविध शासकीय नोकर्‍यांमध्ये खेळाडुंच्या ५ टक्के कोट्यातून आरक्षणाचा लाभ घेऊन जवळपास ६० जणांनी नोकर्‍या मिळविल्या असल्याचे तपासात समोर आले आहे. याशिवाय आणखी १० ते १५ जणांची अंतिम निवड करण्यात आली आहे. याबाबत खात्री न करता ते प्रमाणित करणारे शासकीय सक्षम क्रीडा अधिकारी यांनी काही जणांना ते खेळाडू नसताना खेळाडू दाखवुन आरक्षणाचा लाभ मिळवुन देण्यासाठी अन्यायाने संगनमत व कट करुन शासनाचे व जनतेचे आर्थिक नुकसान केले आहे. गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त शंकर खटके तपास करीत आहेत.

काय आहे कुराश खेळ

कुराश हा मध्य आशियातील उझबेकिस्तानमधील सुमारे साडेतीनशे वर्षाहून अधिक जुना एक पारंपारिक कुस्तीचा आणि लढाऊ खेळ आहे. आपल्याकडील प्रसिद्ध ज्युदो खेळाच्या जवळ जाणारा हा खेळ आहे. १३० देशामध्ये हा खेळ खेळला जातो.

You may have missed