Pune Crime News | बाजारात 330 रुपयाला सिमेंट गोणी असताना 270 रुपयांनी 1 कोटी 20 लाखांचे सिमेंट विकून डिलरला 53 लाखांना फसविले; पैसे मागितल्यावर जीवे ठार मारण्याची दिली धमकी
पुणे : Pune Crime News | प्रति सिमेंट गोणीवर ५ रुपये कमिशनवर सिमेंटच्या ऑर्डर घेऊन देतो, असे सांगून एकाने डिलरकडून तब्बल १ कोटी २० लाख रुपयांचा माल उचलला. डिलरकडे ६६ लाख ३० हजार रुपये जमा केले. उर्वरित पैसे परत न दिल्याने माल दिलेल्याकडे चौकशी केल्यावर डिलरला धक्का बसला. बाजारात सिमेंट गोणी ३३० रुपये असताना त्याने २७० रुपयांना विकून ऑर्डर आणल्या. त्यानंतर डिलरने उर्वरित पैसे मागितल्यावर बिहारहून बंदूक आणली आहे. जास्त त्रास दिल्यास कार्यक्रम करेन, अशी जीवे ठार मारण्याची डिलरला धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत सिमेंट डिलर अमितसिंग चरणजितसिंग छाबडा (वय ३८, रा. औंध) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी संकेत लक्ष्मण गोरे Sanket Laxman Gore (वय ३५, रा. सिद्धार्थनगर, एन आय बी एम रोड, कोंढवा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार विमाननगरमधील अमित एन्टरप्रायझेस एजन्सीच्या कार्यालयात मार्च २०२३ ते डिसेंबर २०२४ दरम्यान घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे अमितसिंग छाबडा या नावाने सिमेंट एजन्सी आहे. फिर्यादी यांची ए सी सी सिमेंटचे मार्केटिंग ऑफिसर प्रियांक गुप्ता यांनी संकेत लक्ष्मण गोरे यांच्याशी ओळख करुन दिली. संकेत गोरे याने मी सिमेंटच्या ऑर्डर आणतो. मला प्रत्येक सिमेंट बॅगमागे ५ रुपये कमिशन द्या. त्यानंतर संकेत गोरे याने सिमेंट विक्रेते यांच्याकडून सिमेंटच्या ऑर्डर व त्याचे पैसे घेऊन त्यांच्याकडे जमा करण्याचे काम करीत असे. त्या करीता संकेत गोरे याला प्रत्येक बॅगमागे ५ रुपये कमिशन देत होते.
संकेत गोरे याने मी सिमेंटच्या ऑर्डर आणतो. मला प्रत्येक सिमेंट बॅगमागे ५ रुपये कमिशन द्या. त्यानंतर संकेत गोरे याने सिमेंट विक्रेते यांच्याकडून सिमेंटच्या ऑर्डर व त्याचे पैसे घेऊन त्यांच्याकडे जमा करण्याचे काम करीत असे. त्या करीता संकेत गोरे याला प्रत्येक बॅगमागे ५ रुपये कमिशन देत होते. संकेत गोरे दुकानदारांना सिमेंट दिल्यावर तो दुकानदारांकडून पैसे स्वीकारुन ५ रुपये कमिशन काढून घेऊन उर्वरित रक्कम त्यांना देत असे. मार्च २०२३ पासून ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत संकेत गोरे याच्या मार्फत १ कोटी २० लाख रुपयांचे सिमेंट विक्री करीता दिले होते. या रक्कमेपैकी ६६ लाख ३० हजार २५० रुपये त्याने जमा केले होते.
परंतु, उर्वरित ५३ लाख ६९ हजार ७५० रुपये परत करीत नव्हता. त्यामुळे फिर्यादी यांनी सिमेंटचे ग्राहक यांना फोन करुन विचारले की, सिमेंटची गाडी गेलेली आहे. परंतु, पेमेंट झालेले नाही. तेव्हा त्यांनी सांगितले की, संकेत गोरे याला पेमेंट केलेले आहे. त्यावेळी फिर्यादी यांनी त्यांना तुम्ही सिमेंट काय रेटमध्ये घेतले आहे़, असे विचारले. तेव्हा त्यांनी संकेत गोरे याने २७० रुपये प्रति बॅग सिमेंट दिलेले आहे. त्यावेळी सिमेंट प्रति बॅग ३३० रुपये चालु होता. त्यानंतर त्यांनी संकेत गोरे याला वारंवार उर्वरित रक्कमेबाबत विचारणा केली. तेव्हा त्याने एकाकडे २० लाख रुपये सिमेंटचे पेमेंट बाकी आहे. त्याच्या बदल्यात मी धायरी येथील फ्लॅट कुलमुखत्यार पत्राने लिहून घेतला आहे, असे सांगून त्याच्या झेरॉक्स पाठविल्या होत्या. त्यानंतर त्याने ३१ मार्च २०२५ रोजी ४६ लाख रुपयांचा चेक दिला. त्यानंतर त्याने मी भाऊ, दादा याच्या सोबत असून तु माझ्याकडून कोणत्याही प्रकारे रक्कम घेऊ शकत नाही. तुला काय करायचे ते कर, असे म्हणून शिवीगाळ केली. मी बिहार येथून गावठी बंदूक आणली आहे. तू मला जास्त त्रास दिल्यास मी तुझा कार्यक्रम करेल, अशी धमकी दिली. त्यामुळे त्यांनी घाबरुन तेव्हा तक्रार दिली नव्हती. पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड तपास करीत आहेत.
