Pune Crime News | पुणे : खराडीत स्पाच्या आडून कथित वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; व्यवस्थापिका ‘राधिका’ ताब्यात, महिलेची सुटका

Pune Crime News | Pune: Alleged prostitution racket uncovered behind a spa in Kharadi; manager 'Radhika' taken into custody, woman released

पुणे : Pune Crime News |  खराडी परिसरात स्पाच्या आडून कथितरित्या सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. माहितीची खात्री करण्यासाठी पोलिसांनी बनावट ग्राहक पाठविला आणि त्यानंतर छापा टाकून 38 वर्षीय व्यवस्थापिका राधिका हरिप्रसाद शर्मा (38) Radhika Hariprasad Sharma हिला ताब्यात घेतले.

कारवाईदरम्यान पोलिसांनी नागालँड येथील 26 वर्षीय महिलेची सुटका करून तिला सुरक्षितस्थळी पाठविले. स्पासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या 54 वर्षीय महिलेलाही या प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, खराडीतील सिटी व्हिस्टा इमारतीच्या विंग-ए मधील पहिल्या मजल्यावर असलेल्या फील टच स्पामध्ये हा कथित प्रकार सुरू होता.

छाप्यादरम्यान बनावट ग्राहकासाठी वापरलेले कथित 4 हजार रुपये, काउंटरवरील 18 हजार 500 रुपये रोख, दोन मोबाईल फोन, पेमेंट यंत्र, सीसीटीव्ही डीव्हीआर, दरपत्रक आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे 74 हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.

पोलिसांच्या माहितीनुसार, संबंधित जागेचा भाडेकरार फेब्रुवारी 2026 मध्ये करण्यात आला होता. खराडी पोलीस ठाण्यात स्पा व्यवस्थापिका आणि जागा उपलब्ध करून देणाऱ्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

You may have missed