Pune Crime News | केतन अगरवालचा खुन केल्यानंतर चेतनने रितेशला भेटून कसे मारले याची दिली होती माहिती

Pune Crime News | After killing Ketan Agarwal, Chetan had given information about how he met Ritesh and killed him.

सहभागाचा भक्कम पुरावा हाती लागल्याने रितेशला केली अटक : पोलीस अधीक्षक संदिपसिंग गिल

पुणे : Pune Crime News | उद्योजक केतन अगरवाल यांचा खुन केल्यानंतर चेतन चौधरी याने रितेश हांगे याची भेट घेऊन त्याला कसे मारले हे सांगितले होते. खुनाच्या कटामध्ये सहभागी असल्याचे भक्कम पुरावे हाती लागल्याने चेतन चौधरी याचा मित्र रितेश हांगे याला पोलिसांनी अटक केली आहे. अधिक तपासासाठी न्यायालयाने त्याला १२ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली असल्याची माहिती पत्रकार परिषदेत पोलीस अधीक्षक संदिपसिंग गिल यांनी दिली.

लोणावळा ग्रामीण पोलिसांनी ५ सप्टेंबर रोजी रितेश हांगे Ritesh Hange (वय २३, रा. बालेवाडी, मुळ रा. बीड) याला अटक केली आहे. सिया गोयल, चेतन चौधरी यांच्यानंतर या खुन प्रकरणात तिसरी अटक करण्यात आली आहे.

पोलीस अधीक्षक संदिपसिंग गिल यांनी सांगितले की, रितेश हांगे हा चेतन चौधरी याचा बालपणापासूनचा मित्र आहे. रितेश हा पदवीधर असून तो एका बांधकाम व्यावसायिकाकडे कमिशन एजंट म्हणून काम करतो.

केतन अगरवाल याचा खुन झाल्यानंतर याची माहिती कोणाकोणाला असेल, याची चौकशी केल्यावर रितेशचे नाव पुढे आले होते. त्याच्याकडे सुरुवातीला चौकशी केली. त्याचा जाब जबाव नोंदविला होता. त्यात त्याने माहिती दिली होती. परंतु, ती अपूर्ण माहिती होती. सुरुवातीपासून त्याचा या खुनाचा कट रचण्यात सहभाग होता. चेतन याने खुन केल्यानंतर एके ठिकाणी भेटून रितेश याला आम्ही खुन कसा केला, याची माहिती दिली होती. याबाबतचे स्पष्ट पुरावे हाती लागल्यानंतर पोलिसांनी या मध्ये भारतीय न्याय संहिता कलम ६१ (२) अन्वये रितेश हांगे याला अटक केली आहे. कलम ६१ (२) हे पूर्वीच्या भा द वि १२० ब प्रमाणे आहे.

रितेश याला पहिल्या दिवसांपासून या कटाची माहिती होती. चेतन चौधरी याचा रितेश हा मित्र असून तो सिया गोयल हिलाही ओळखतो. सुरुवातीला केतन याच्या बॉडीला हिट करण्याचा त्यांचा प्लॅन होता. केतनला मारण्यासाठी त्यांनी तिसर्‍या व्यक्तीची मदत घेण्याचा कट रचला होता. त्यातही रितेश याचा सहभाग होता. त्यानंतर त्यांनी स्वत:च हे कृत्य करण्याचे ठरविल्यानंतरच्या गुन्हेगारी कटात रितेश याचा सहभाग होता. त्याचे तांत्रिक पुरावे मिळाले आहेत. रितेश हांगे हा लोहगडावर गेला होता की नाही, याविषयी पोलीस कोठडी दरम्यान चौकशी करण्यात येईल, असे पोलीस अधीक्षक संदिपसिंग गिल यांनी सांगितले.

You may have missed