Pune Crime News | पुणे: मुंढवा पोलिसांची कारवाई; दोन आरोपींकडून 2.27 लाख रुपये किमतीचे 14 चोरीचे मोबाईल जप्त
पुणे: Pune Crime News | मुंढवा पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने चोरीच्या गुन्ह्याचा कौशल्यपूर्ण तपास करत दोन आरोपींना अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून एकूण 2 लाख 27 हजार रुपये किमतीचे 14 मोबाईल फोन जप्त केले आहेत.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे प्रणित नरेंद्र जाधव Pranit Narendra Jadhav (वय 20, रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा) आणि राहुल सुरेश सहाणी Rahul Suresh Sahani (वय 22, रा. थिटे वस्ती, खराडी) अशी आहेत.
मुंढवा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी तांत्रिक माहिती आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे दोन्ही आरोपींचा शोध घेतला. त्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता चोरीचे एकूण 14 मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले.
जप्त मोबाईलची एकत्रित किंमत सुमारे 2 लाख 27 हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त जीवन बेनिवाल आणि सहायक पोलीस आयुक्त अतुलकुमार नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंढवा पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती स्मिता वासनिक, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सागर गोडे यांच्या सूचनेप्रमाणे तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक, गणेश पिंगुवाले, पोलीस उपनिरीक्षक युवराज पोमण, संभाजी नाईक, पोलीस अंमलदार विनोद सांळुके, राहुल धोत्रे, योगेश गायकवाड, शिवाजी धांडे, चेतन गायकवाड, राहुल मोरे, सचिन बोराटे, रुपेश तोडेकर, सलीम अत्तार, योगेश राऊत, स्वप्निल रासकर, अक्षय धुमाळ यांचे पथकाने केली असून पुढील तपास पोलीस अंमलदार विनोद साळुंके करीत आहेत.
