Pune Crime News | पुणे : 10 हजारांच्या दंडाची भिती घालून 3 हजार रुपयांची खंडणी उकळणार्‍या ट्रॉफिक टोईंग व्हॅनवरील चालक व 2 टोईंग कामगारांना खंडणी विरोधी पथकाने केली अटक

Pune Crime News | Pune: The driver of a traffic towing van who threatened a fine of 10,000 to extort 3,000 rupees and 2 towing workers were arrested by the anti-extortion squad.

पुणे : Pune Crime News | चुकून नो पार्किंगमध्ये कार पार्क केली असताना ती टोईंग करुन नेण्यात आली. कार महाराष्ट्रात पासिंग करुन घेतली नाही, पीयुसी संपलेली आहे, अशी कारणे दाखवुन १० हजार रुपये दंड पडेल, अशी भिती दाखवुन ३ हजार रुपयांची खंडणी एका कारचालकाकडून टोईंग करणार्‍या कामगारांनी उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. खंडणी विरोधी पथकाने कोरेगाव पार्क वाहतूक विभागातील  टोईंग व्हॅनवरील चालक व २ कामगारांना अटक केली आहे.

आकाश नवनाथ सावंत Akash Navnath Sawant (वय २२, रा. स टा वाडी मळा, कोरेगाव पार्क), समीर अतिक अन्सारी Sameer Atik Ansari (वय ३०, रा. प्रायव्हेट रोड) आणि शेख शौकत अतिक अन्सारी Shaikh Shaukat Atik Ansari (वय ३०, रा. ताडीवाडा रोड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

याबाबत अमोल आनंद भिलारे (वय ४६, रा. साऊथ मेन रोड, कोरेगाव पार्क) यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना कोरेगाव पार्क येथील लेन नंबर ६ मध्ये २० जून २०२६ रोजी सायंकाळी साडेसात वाजता घडली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  फिर्यादी हे त्यांची गाडी नजर चुकीने नो पार्किंगमध्ये पार्क करुन गेले होते. टोईंग व्हॅनवरील दोन कामगार आणि चालक यांनी ही कार टोईंग करुन नेली होती. फिर्यादी यांची कार दीव दमण येथील आर टी ओ पासिंगची आहे. तिचे महाराष्ट्रात पासिंग करुन घेतली नाही व पीयुसी संपलेली असून ती काढलेली नाही, अशी कारणे सांगून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची धमकी दिली. फिर्यादी यांना १० हजार रुपये दंडाची भीती घालून त्यांच्याकडून ३ हजार रुपये रोख खंडणी स्वरुपात घेतले. त्यांना कोणतीही पावती दिलेली नाही. याबाबत फिर्यादी यांनी अनेकदा पाठपुरावा केला. परंतु, त्यांना कोणीही समर्पक उत्तर दिले नाही. टोईंग व्हॅनचालकांकडून हे प्रकार सर्रास सुरु असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी खंडणी विरोधी पथकाकडे याबाबत तक्रार दिली होती. सहायक पोलीस निरीक्षक श्रीकांत चव्हाण व त्यांचे सहकारी यांनी याचा शोध घेऊन तिघांना मंगळवारी रात्री अटक केली आहे. त्यांना बुधवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने अधिक तपासासाठी एक दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. फिर्यादी यांच्याबरोबर आणखी कोणाला यांनी लुटले आहे का याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक श्रीकांत चव्हाण करीत आहेत.

You may have missed