Pune Crime News | पुणे : शारीरिक व्याधी, कौटुंबिक अडचणी दूर करण्याचे आमिष? मृत्यूची भीती दाखवून पैसे उकळणाऱ्या ‘मोनाली आई विधाते’सह 5 जणांवर गुन्हा

Pune Crime News | Pune: Lured by promises to cure physical ailments and family problems? Case filed against 5 people, including 'Monali Ai Vidhate', who extorted money by scaring people with the threat of death

पुणे : Pune Crime News |  कौटुंबिक अडचणी कमी करुन शारीरिक व्याधी दूर करण्याचे आश्वासन देऊन मृत्यूची भीती दाखवुन पुजा करण्याच्या नावाखाली फसवणूक करणार्‍या मोनाली आई विधाते हिच्यासह ५ जणांवर बिबवेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मोनाली विधाते Monali Aai Vidhate (रा. कमल पॅराडाईजच्या बाजूला, सुखसागरनगर, कात्रज), कृष्णा विधाते, मोनालीचा भाऊ मयुर, अशोक बनकर, मंजु कौर यांच्यावर महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट प्रथा व जादुटोणा अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी येथील एका ४७ वर्षाच्या नागरिकाने फिर्याद दिली आहे. हा प्रकार सुखसागरनगर येथील मोनाली विधाते हिच्या घरी १७ फेब्रुवारी २०२६ पासून घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोनाली विधाते हिने फेसबुक अकाऊंटवर ‘‘गुरुवर्य मोनाली आई विधाते’’ या नावाने  कौटुंबिक  अडचणी सोडविते. अशा प्रकारचे देवी देवतांचे अनेक व्हिडिओ अपलोड करुन फिर्यादी व इतर लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. डिसेंबर २०२५ ते १ सप्टेंबर २०२६ पर्यंत फिर्यादी यांच्या शारीरिक व्याधी व कौटुंबिक अडचणी कमी करण्यासाठी हळदी कुंकू , दोरा,बाहुली पाठवून दिली. त्यानंतर त्यांना मोनाली विधाते हिने आपल्या सुखसागरनगर येथील घरी बोलावून घेतले.

फिर्यादी यांच्या शारीरिक व्याधी व कौटुंबिक अडचणीमध्ये मृत्युची भिती दाखवली. त्यांचेवरुन उतारे उतारते, असे सांगून जादुटोणा केला. मोनाली विधाते व अशोक बनकर या सर्वांनी मिळून भेटण्याकरीता फिर्यादी यांच्याकडून ३१०० आणि ३०० रुपये घेतले. जादुटोणा साहित्याचे व दोन वेळा उतारे केल्याचे रोख स्वरुपात २१ हजार व ऑनलाईन २१ हजार रुपये असे एकूण ४५ हजार ४०० रुपये घेतले. फिर्यादी यांची फसवणूक करुन शिवीगाळ करुन जीवे ठार मारण्याची धमकी देऊन व मृत्युची भिती दाखवुन त्यांच्याकडून जबरदस्तीने ४५ हजार ४०० रुपये घेतले. आपली फसवणुक झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते तपास करीत आहेत.

You may have missed