Pune Ganeshotsav | गणेशोत्सवात विद्यानंद बापट यांना पुण्यातून हद्दपार करण्याची मागणी; हिंदू सेवा संघाचा 48 तासांचा अल्टिमेटम
पुणे : Pune Ganeshotsav | हिंदू सेवा संघाने विद्यानंद बापट यांना गणेशोत्सवाच्या काळात पुणे शहरात प्रवेशबंदी करावी, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे. हिंदू देवी-देवता, गणेशोत्सव आणि धार्मिक भावना यांचा अवमान केल्याचा आरोप संघटनेने बापट यांच्यावर केला आहे.
हिंदू सेवा संघाचे अध्यक्ष रोहित मारणे यांनी ११ सप्टेंबर ते २६ सप्टेंबर या कालावधीत विद्यानंद बापट यांना पुणे शहरात प्रवेशबंदी करावी, अशी मागणी केली आहे.
तसेच, बापट यांनी हिंदू भाविक, गणेश मंडळे आणि वारकरी संप्रदायाची बिनशर्त माफी मागावी, अशीही संघटनेची मागणी आहे.
यासाठी बापट यांना ४८ तासांचा अल्टिमेटम देण्यात आला असून, मागणी मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा हिंदू सेवा संघाने दिला आहे.
गणेशोत्सव शांततेत आणि सलोख्याने पार पडावा, यासाठी प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी, अशी संघटनेची भूमिका आहे.
