Pune Crime News | कल्याणीनगरमधील पॉश हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय करवुन घेणार्या एजंटाला पकडून अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने 3 महिलांची केली सुटका
पुणे : कल्याणीनगर येथील हॉटेलमध्ये महिलांकडून वेश्या व्यवसाय करवुन घेतला जात असल्याच्या माहितीवरुन अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने एजंटाला अटक करुन तीन महिलांची सुटका केली.
सुनिल साहेबराव कुर्हाडे Sunil Sahebrao Kurhade (वय ३५, रा. राहुलनगर, निगडी) असे या एजंटाचे नाव आहे.
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाला कल्याणीनगर येथील हॉटेल ईलाईट स्टे या हॉटेलमध्ये तरुणींकडून वेश्या व्यवसाय करुन घेत असल्याची माहिती मिळाली. पोलीस निरीक्षक आशालता खापरे यांच्या मार्गदर्शनाखाली बातमीची पडताळणी केली. बनावट ग्राहक पाठवुन खातरजमा केली. बनावट ग्राहकाने इशारा करताच पोलिसांनी हॉटेल ईलाईट स्टे वर छापा घातला. तेथील एजंट सुनिल कुर्हाडे याला पकडून तेथील ३ तरुणींची सुटका करण्यात आली. येरवडा पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई पोलीस उपायुक्त गौहर हसन, सहायक पोलीस आयुक्त शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आशालता खापरे, सहायक पोलीस निरीक्षक विक्रम मिसाळ, पोलीस अंमलदार ईश्वर आंधळे, तुषार भिवरकर, बबनराव केदार, इम्रान खान नदाफ, अविनाशा कोडे, किरण बरडे, वैशाली खेडेकर, वैशाली इंगळे यांनी केली आहे.
