Pune Crime News | स्वारगेट, सहकारनगर, पर्वती, मार्केटयार्ड, बिबवेवाडी, भारती विद्यापीठ, आंबेगाव पोलीस ठाण्यातील 701 गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई, पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तडीपार

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | गणेशोत्सव काळात कायदा सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी परिमंडळ दोन चे पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी ७ पोलीस ठाण्याचे हद्दीतील ७०१ गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.

स्वारगेट – १००
सहकारनगर – १०१
पर्वती – ११५
मार्केटयार्ड – ७६
बिबवेवाडी – १०४
भारती विद्यापीठ – १०४
आंबेगाव – १०१

अशा एकूण ७०१ रेकॉर्डवरील गुन्हेगारांना पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात प्रवेश करण्यास, वास्तव्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात भाग घेण्यास, मिरवणुकीमध्ये सहभागी होण्यास, सार्वजनिकरित्या वावरण्यास मनाई केली आहे. सार्वजनिक शांततेस बाधा येईल, असे कृत्य करण्यास मनाई केली आहे. या सर्व गुन्हेगारांना त्याच्या त्यांच्या पोलीस हद्दीतून तडीपार करण्यात आले आहे. पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी हे आदेश दिले आहेत.

You may have missed