Pune Crime News | मोठ्या पॅकेजचे आमिष? नोकरी दिल्याचे दाखवून 38 तरुणांची लाखोंची फसवणूक करणाऱ्या CEO अंकुश वानखेडेसह 5 जणांवर गुन्हा दाखल

Pune Crime News

पुणे : Pune Crime News |  क्रिएटिव्ह वेब सोल्युशन (Creative Web Solution) नावाने कंपनी स्थापन करून तरुणांना मोठ्या पॅकेजचे आमिष दाखवून त्यांच्याकडून ३० टक्के रक्कम घेऊन ३८ तरुण तरुणींची  ७७ लाख १३ हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या ५ जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश वानखेडे उर्फ आशिष रहाटे (Ankush Wankhede alias Ashish Rahate), मुख्य व्यवस्थापक तेजश्री खताळ (Tejashree Khatal), मनुष्य बळ अधिकारी प्रसन्न पद्माकर राव आंबेकर (Prasanna Padmakarrao Ambekar) , सागर सुरेश शेलार (Sagar Suresh Shelar) आणि मानसी मंगेश शेलार (Manasi Mangesh Shelar) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत एका ३९ वर्षाच्या महिलेने चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार औंध येथील आय टी आय रोडवरील क्रिएटिव्ह वेब सोल्युशन या कंपनीत ५ मे २०२६  ते आतापर्यंत झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकुश वानखेडे याने क्रिएटिव्ह वेब सोल्युशन नावाची कंपनी स्थापन केली. त्यामध्ये तरुण-तरुणी यांना मोठ्या पॅकेजचे जॉब ऑफर केले. त्या पॅकेजच्या ३० टक्के रक्कम म्हणजे २ लाख ५८ हजार रुपये घेतले. तसेच इतर ३८ तरुण तरुणांकडून एकूण ७५ लाख १३ हजार रुपये असे एकूण ७७ लाख  ७१ हजार रुपये घेतले. त्या सर्वांकडून ४ महिने काम करवून घेतले.त्यांना ४ महिन्याचा पगार दिला नाही. त्यानंतर २ आठवड्यापूर्वी अचानक कंपनी बंद करून अंकुश वानखेडे  व इतर प्रमुख फरार झाले आहेत.

आर्थिक व मानसिक फसवणूक झालेल्या या तरुण तरुणींनी सुमारे २ आठवड्यापूर्वी पोलिसांकडे संपर्क साधला. त्यानंतर चतुःश्रृंगी पोलिसांनी आता गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक उमेश कोळी तपास करीत आहेत.

You may have missed