Pune Crime News | जीएसटीचे बिल कोणी भरायचे यावरुन झालेल्या वादात तरुणाने छातीत कात्रीने मारुन कर्मचार्याला केले गंभीर जखमी
पुणे : Pune Crime News | कंपनी सुरु करुन फरशी बसविण्याचे काम दोघांनी पूर्वी एकत्र केले़ त्यावेळी केलेल्या कामाचे जीएसटीचे पैसे कोणी भरायचे यावरुन झालेल्या वादात साडूच्या मुलाने छातीत लोखंडी कात्रीने वार करुन कर्मचार्याला गंभीर जखमी केल्याचा प्रकार समोर आला आहे.
राजेंद्र दशरथ जाधव (वय ५०, रा. मळाई पार्क, फुरसुंगी) यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी विशाल रामदास जाधव Vishal Ramdas Jadhav (वय २५, रा. मळाई पार्क, फुरसुंगी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मळाई पार्क येथील श्री साई विश्व स्कुलचे समोर १४ सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजता घडला. राजेंद्र जाधव यांच्यावर ससुन रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र जाधव हे फरशी बसविण्याचे काम करतात. त्यांचा मुलगा सुरज हा वॉटर प्रुफींगचे काम करतो. त्यांचा साडु रामदास जाधव, मेहुणी आशा जाधव व त्यांचा मुलगा विशाल जाधव हे २ वर्षांपासून त्यांच्याजवळ राहण्यास आले आहेत. सुरज व मेहुण्याचा मुलगा विशाल यांनी त्यावेळी वॉटर प्रुफींगचे काम करण्याच्या उद्देशाने श्री स्वामी समर्थ वॉटर प्रुफींग या नावाने एजन्सी चालू केली होती. ही एजन्सी नोंदणी करण्यासाठी ४५ हजार रुपये खर्च दोघांनी केला होता. वर्षभर एकत्र काम केले. विशाल हा काही कामे स्वत: करुन स्वत: फायदा घेत आहे, असे समजले. त्यावरुन सुरज व विशाल यांच्यात वाद होऊन दोघे वेगळे झाले. २ महिन्यांपूर्वी विशाल यांच्या घरी आला.
मागील केलेल्या कामाचे जीएसटी चे दीड लाख रुपये भरायेच आहेत. त्यावेळी सुरज म्हणाला की, विशाल तू सर्व एजन्सी स्वत: चे नावे करुन, स्वत: फायदा घेतला आहेस व आता जीएसटी आम्ही का भरु. त्यावरुन त्यांच्यात वाद झाले होते. १४ सप्टेंबर रोजी रात्री विशाल जाधव, बबन जाधव, आशा जाधव, रामदास जाधव हे फिर्यादी यांच्या घरी आले. जीएसटीच्या पैशांवरुन वाद घातला. तेव्हा फिर्यादी यांनी घरात वाद नको, आपण बाहेर जाऊ. त्यानंतर ते श्री साई विश्व स्कुलचे समोर रस्त्यावर असताना विशाल जाधव याने फिर्यादी व त्यांचा मुलगा सुरज यांना जीएसटी बिलाचे कारणावरुन शिवीगाळ करुन हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांनी प्रतिकार केल्यावर विशाल याने त्याच्याजवळील लोखंडी कात्री काढून बगलेत मारली. त्यातून रक्त येऊ लागले. ते पाहून विशाल पळून गेला. पोलिसांनी त्यांना ससून रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी जखम गंभीर असल्याचे सांगून त्यांना दाखल करुन घेतले. पोलीस उपनिरीक्षक खंदारे तपास करीत आहेत.
