Pune Crime News | दुकानात शिरुन तोडफोड करुन गल्ल्यातील रोकड जबरदस्तीने चोरुन नेणाऱ्या तिघा गुन्हेगारांना लोणीकंद पोलिसांनी केली अटक
पुणे : Pune Crime News | चिकन सेंटरमध्ये शिरुन तिघांनी कामगाराला मारहाण करुन काऊंटरवर ठेवलेल्या अंड्याचे ट्रे फोडून दुकानाची तोडफोड करुन गल्ल्यातील ३१ हजार रुपये चोरुन नेणार्या तिघांना लोणीकंद पोलिसांनी अटक केली आहे.
कृष्णा सुखदेव डोंगरे Krishna Sukhdev Dongre (वय ४९, रा. दत्तसमुद्धीनगर, लोणीकंद, मुळ रा. कोथरबन, ता. वडवणी, जि. बीड), सौरभ कृष्णा डोंगरे Saurabh Krishna Dongre (वय २३, रा. दत्तसमुद्धीनगर, लोणीकंद), मनोज लहु ठोसर Manoj Lahu Thosar (वय ३२, रा. सदगुरु कॉलनी, वाकड, मुळ रा. रोहकल ता. परांडा, जि. धाराशिव) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत.
याबाबत गणेश तानाजी भोगावडे (वय ५२, रा. लोणीकंद) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांचे लोणीकंदमधील रामनगर येथे अभिषेक चिकन सेंटर हे दुकान आहे. १४ सप्टेंबर रोजी दुपारी अडीच वाजता शाम उल्ला शेख हा कामगार दुकानात होता. त्यावेळी कृष्णा डोंगरे त्याच्या दोन साथीदारांसह दुकानात आला. त्यांनी शेख याला हाताने व लाकडी काठीने मारहाण केली. दुकानात काऊंटरवर ठेवलेले अंड्याचे ट्रे फोडून टाकले. दुकानाची तोडफोड केली. काऊंटरच्या ड्रॉवर मध्ये असलेला कामगाराचा मोबाईल व ३१ हजार रुपये जबरदस्तीने चोरी करुन ते दुचाकीवरुन पळून गेले होते. ही घटना समजताच लोणीकंद पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिता रोकडे यांनी घटनास्थळाला भेट देऊन आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले. पोलिसांनी तिघांना अटक करुन बुधवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने तिघांना तपासासाठी २ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक गजानन कागणे तपास करीत आहेत.
