Pune Crime News | गणेशोत्सवात दहशत माजविण्याच्या तयारीत असलेल्यास गुन्हे शाखेच्या युनिट 1 च्या पथकाने केले गजाआड

Pune Crime News | If someone was preparing to create terror during Ganeshotsav, the Crime Branch Unit 1 team busted them

पुणे : Pune Crime News | गणेशोत्सवात दहशत माजविण्याच्या तयारीत दोघे जण असल्याच्या मिळालेल्या माहितीवरुन गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने लक्ष्मी रोडवरील हुजूरपागा शाळेजवळ एकाला पकडले.

प्रथमेश शंभु मोरे Prathamesh Shambhu More (वय १८, रा. दांडेकर पुल) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेच्या युनिट एककडून लक्ष्मी रोड  परिसरात गस्त घालण्यात येत होती. पोलीस अंमलदार संतोष नागरे यांना माहिती मिळाली की, लक्ष्मी रोडवरील हुजूरपागा शाळेसमोर मोरे साथीदारासह थांबला आहे. त्यांच्याकडे घातक शस्त्र आहे. ते दहशत माजविण्याच्या तयारीत आहेत. या माहितीच्या आधारे  पोलिसांच्या पथकाने सापळा लावून प्रथमेश मोरे याला पकडले. त्याच्याकडून कोयता जप्त करण्यात आला. त्याचा साथीदार गर्दीत पळून गेला.

ही कारवाई पोलीस उपायुक्त गौहर हसन, सहायक आयुक्त शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड, पोलीस उपनिरीक्षक  धीरज राऊत, पोलीस अंमलदार बाबासाहेब दांगडे, संतोष नागरे, प्रमोद जगताप, सचिन कोळी, रेवन्नाथ भुजबळ,  संतोष अनुसे यांनी केली आहे़

You may have missed