Pune Crime News | पोस्कोच्या गुन्ह्यात 2 महिन्यांपासून फरार असलेल्या गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या युनिट 1 च्या पथकाने कॅम्पमधून केले जेरबंद़

Pune Crime News | The criminal who had been on the run for 2 months in the POSCO case was nabbed from the camp by Unit 1 of the crime branch team.

पुणे : Pune Crime News | पाटील इस्टेट येथील एका अल्पवयीन मुलीचे कपडे फाडून तिच्या आईला धमकी दिल्यानंतर गेले २ महिने फरार असलेल्या गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने कॅम्पमधून अटक केली आहे.

अबालू जाफर इराणी Abalu Jafar Irani (वय ५०, रा. पाटील इस्टेट, शिवाजीनगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

पाटील इस्टेटमध्ये अबालु इराणी याने फिर्यादी यांचे केस ओढून त्यांना पोटात कमरेवर व छातीवर लाथ मारुन हाताने त्यांच्या छातीवर मारहाण केली. तसेच फिर्यादी यांचे कपडे फाडून तिच्या आईला धमकी दिली होती. खडकी पोलिसांनी पोस्को खाली अबालु इराणी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून तो फरार होता.

गुन्हे शाखेच्या युनिट १ चे पथक पाहिजे असलेले फरारी आरोपींचा शोध घेत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार बाबासाहेब दांगडे यांना पोस्को गुन्ह्यातील फरार आरोपी अबालु इराणी हा कॅम्पमधील साहिल हॉटेलसमोर थांबला असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या अनुषंगाने पोलीस पथक तेथे गेले. आरोपीचा शोध घेत असताना तो साहिल हॉटेलच्या समोर थांबलेला दिसला. पोलिसांना पाहून तो घाईघाईत निघून जाऊ लागला. पोलिसांनी त्याला पळून जाण्याची संधी न देता जागेवरच पकडले. पुढील कारवाईकरीता त्याला खडकी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक धीरज राऊत, पोलीस अंमलदार बाबासाहेब दांगडे, प्रमोद जगताप, संतोष नांगरे, संतोष अनुसे, अशिष शेलार यांनी केली आहे.

You may have missed