Wakad Pune Crime News | वाकड (पुणे) : बहिणीची छेडछाड केल्याच्या कारणावरुन तरुणावर सपासप वार करुन खुन; पोलिसांकडून तिघांना अटक
पुणे : Wakad Pune Crime News | बहिणीची छेड काढल्याच्या कारणावरुन चौघांनी तरुणाच्या तोंडावर, गळ्यावर, गुप्त भागावर वार करुन त्याचा निर्घुण खुन केल्याचा प्रकार समोर आला आहे. वाकड पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
मारोती बाळासाहेब बनसोडे (वय ३५, रा. बोधेगाव ता. परळी, जि. बीड सध्या रा. बौद्धनगर, दत्तनगर, चिंचवड) असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्याचे मामा सुग्रीव लक्ष्मण गायकवाड (वय ५४, रा. स्प्रिंग गार्डन सोसायटी, बोराडेवाडी, मोशी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी अमित दशरथ साळुंखे Amit Dasharath Salunkhe (वय २६, रा. जगतापनगर, थेरगाव, मुळ रा. सोमेश्वर वाकी, ता. बारामती), किशोर सुभाष वाघमारे Kishor Subhash Waghmare (वय ३९, रा. पवारनगर, थेरगाव), भारत संजय पवार Bharat Sanjay Pawar (वय २३, रा. पवारनगर, थेरगाव) यांना अटक केली आहे. ही घटना वाकड येथील कावेरीनगर भाजी मंडई समोरील मोकळ्या जागेत १९ सप्टेंबर रोजी रात्री साडेअकरा वाजता घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाचा मारोती बनसोडे आणि आरोपी हे मुळचे बीड जिल्ह्यातील राहणारे आहेत. मारोती बनसोडे याने बहिणीची छेड काढल्याचा आरोपींना संशय होता. मारोती बनसोडे हा वाकड येथील कावेरीनगरमधील भाजी मंडईसमोर आला होता. यावेळी आरोपीने त्याला गाठून बहिणीची छेड का काढतोय, अशी विचारणा केली. त्यावरुन त्यांच्यात वाद झाला. तेव्हा आरोपींनी मारोती बनसोडे याच्या तोंडावर, गळ्यावर, हनुवटीवर, गुप्त भागावर हत्याराने वार करुन जबर जखमी केले. त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याचा मृत्यु झाल्याचे सांगितले. पोलिसांनी तिघांना अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक सागर भोकरे तपास करीत आहेत.
