Pune Crime News | बनावट कागदपत्रांच्या आधाराने मालमत्ता हडप केल्याच्या आरोपावरुन बाणेरमधील चौघांवर गुन्हा दाखल; येथे आला तर जीवे ठार मारण्याची धमकी
पुणे : Pune Crime News | कोणतेही दस्त लिहून दिलेले नसताना बनावट हमीपत्र व ताबा पावती बनवुन त्याच्या आधारे मिळकत हडपल्याचा आरोप करण्यात आला आहे. न्यायालयाच्या आदेशावरून बाणेर पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच या ठिकाणी आला तर जिवे ठार मारण्याची धमकी फिर्यादी यांना दिली आहे.
याबाबत सनी रामदास सायकर (वय २८, रा़ सायकर चौक, बाणेर) यांनी बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी संजय सिताराम पिंपरकर Sanjay Sitaram Pimparkar (वय ६०, रा़ साकेत सोसायटी, डी पी रोड, बाणेर), स्नेहल संजय पिंपरकर Snehal Sanjay Pimparkar
(वय ५४), गणेश तापकीर (वय ४५) आणि शिवराज केदारी (वय ४०, रा़ बाणेर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे़ हा प्रकार बाणेर येथील सायकर चौकजवळील सर्व्हे नंबर १२१/१अ/२ व सर्व्हे नंबर १२२/१/२/२ येथे २००२ ते १६ ऑगस्ट २०२५ दरम्यान घडला आहे़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सनि सायकर यांच्या वडिलांच्या नावावर बाणेर येथील सायकर चौकाजवळ मिळकत आहे़ संजय पिंपरकर व स्नेहल पिंपरकर यांनी संगनमत करुन रामदास सायकर व इतर यांनी कोणतेही दस्त आरोपींना लिहून दिलेले नाही़ असे असताना खोटी व बनावट हमीपत्र व ताबा पावती अशी कागदपत्रे तयार करुन त्यावर साक्षीदार विठ्ठल रघुनाथ आल्हाट व बी ए पुरोहित यांच्या बनावट सह्या करुन फिर्यादी यांची मिळकत हडपली आहे़ या मिळकतीवर फिर्यादी २३ डिसेंबर २०२४ रोजी तसेच १६ ऑगस्ट २०२५ रोजी गेले असताना संजय पिंपरकर, गणेश तापकीर, शिवराज केदारी यांनी स्वत: व कामगारांमार्फत फिर्यादी यांना शिवीगाळ केली़ पुन्हा मिळकतीवर आला तर जिवे ठार मारुन टाकेन, अशी धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीमध्ये केला आहे़ फिर्यादी यांनी न्यायालयात धाव घेऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती़ न्यायालयाने गुन्हा दाखल करुन तपास करण्याचा आदेश दिल्याने बाणेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़ पोलीस निरीक्षक विजय खिल्लारे तपास करीत आहेत़
