Maharashtra Drought News | राज्यातील 358 पैकी 265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय ! दुष्काळी मदतीअंतर्गत बाधित शेतकरी आणि नागरिकांना मिळू शकतात 10 मोठे लाभ

Maharashtra Drought News | Drought declared in 265 out of 358 talukas in the state; Chief Minister Devendra Fadnavis makes a big decision! Under drought relief, affected farmers and citizens can get 10 major benefits

मुंबई : Maharashtra Drought News | महाराष्ट्रातील अनेक भागांत गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने राज्य सरकारने बाधित शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या मदत उपाययोजना जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पीक नुकसान, पाणीटंचाई आणि चाऱ्याच्या संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याचे आश्वासन दिले आहे. मदत जाहीर करण्यापूर्वी मुख्यमंत्री आणि विविध मंत्र्यांनी दुष्काळग्रस्त भागांचे दौरे करून परिस्थितीचा आढावा घेतला.

दुष्काळी मदतीअंतर्गत बाधित शेतकरी आणि नागरिकांना जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जवसुलीला स्थगिती, कृषीपंपांच्या वीजबिलात सवलत, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी, रोजगार हमी योजनेतून अधिक कामे, आवश्यक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे टँकर, टंचाईग्रस्त गावांतील शेतीपंपांची वीजजोडणी खंडित न करणे, शेतकरी व शेतमजुरांना अन्नधान्याची मदत आणि जनावरांसाठी चाऱ्याची व्यवस्था अशा विविध उपाययोजनांचा लाभ मिळू शकतो.

याशिवाय जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेणे, पिण्याचे पाणी व जनावरांसाठी पाण्याचे नियोजन सुरू ठेवणे, पीक नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करणे तसेच पिकांची स्थिती दर्शवणारी छायाचित्रे आणि GPS माहिती संकलित करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत.

You may have missed