Pune Crime News | मतदार नोंदणीचे कर्तव्य न बजाविल्याने अभियंता महिलेविरुद्ध गुन्हा
पुणे : Pune Crime News | अतिरिक्त सहायक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून नियुक्ती केल्यानंतर कामावर गैरहजर राहिल्या प्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागातील सहायक अभियंता महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत वाघोलीचे ग्राम महसूल अधिकारी गोकुळ भगत यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फियार्दीनुसार, कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागातील सहायक अभियंता महिला शुभांगी पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभियंता महिलेची मतदान केंद्र ३४० ते ३४९ साठी अतिरिक्त सहायक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. नियुक्ती केल्यानंतर त्या कर्तव्यावर हजर झाल्या नाहीत. त्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली होती. मात्र, त्यांनी या नोटिशीला उत्तर दिले नाही. शासकीय आदेशानुसार सोपविण्यात आलेले राष्ट्रीय कर्तव्य बजाविण्यास नकार दिल्याने त्यांच्याविरुद्ध लोकप्रतिनिधित्व अधिनियम कलम ३२ अन्वये कारवाई करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक विनायक अहिरे तपास करत आहेत.
