Shri Mahalaxmi Mandir, Sarasbag | देवीस्वरूप असलेल्या 108 मुलींचे श्री महालक्ष्मी मंदिरात कन्यापूजन ! श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबागतर्फे आयोजन; विविध शाळेतील मुलींचा सहभाग (Video)

Shri Mahalaxmi Mandir, Sarasbag | 'Kanya Pujan' (worship of young girls, viewed as embodiments of the Goddess) held at Shri Mahalaxmi Mandir! Organized by Shri Mahalaxmi Mandir, Sarasbag; girls from various schools participated (Video)

पुणे : Shri Mahalaxmi Mandir, Sarasbag | ‘या देवी सर्वभूतेषु, शक्तिरूपेण संस्थिता… नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः…’ या मंगल स्वरांनी महालक्ष्मी मंदिराचा परिसर दुमदुमून गेला. श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबागच्या वतीने सार्वजनिक नवरात्रोत्सवानिमित्त मंदिरात बाल शिशु मंदिर आणि समर्थ विद्या मंदिर प्राथमिक शाळेतील १०८ मुलींच्या ‘कन्यापूजन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

https://www.instagram.com/p/Deg9tpZpn5K

कन्या पूजन हा नवरात्री पूजेचा एक अविभाज्य भाग आहे. ज्यामध्ये लहान मुलींना देवी दुर्गाच्या नऊही रूपांचे प्रतीक मानून त्यांची देवी म्हणून पूजा केली जाते. यावेळी अभिनेत्री पूजा पवार, अपूर्वा सपकाळ, मंदिर ट्रस्टच्या प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त व उत्सव प्रमुख डॉ.तृप्ती अग्रवाल, विश्वस्त प्रवीण चोरबेले आदी उपस्थित होते.

कन्यापूजन करताना मुलींचे पाद्यपूजन आणि औक्षण करण्यात आले. सुगंधित अत्तरपाणी मुलींवर शिंपडून त्यांचे पाद्यपूजन देखील करण्यात आले, तसेच ट्रस्टतर्फे सर्व मुलींना खाऊ आणि भेटवस्तू देण्यात आल्या. देवीनामाचा जयघोष करीत देवीस्वरूप असलेल्या लहान मुलींनी आपले पूजन होत असल्याचे दृश्य पाहिले आणि त्यावेळी प्रत्येक चिमुकलीच्या चेहऱ्यावरील आनंद काहीसा वेगळा होता.

प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल म्हणाल्या, श्री महाकाली, श्री महालक्ष्मी आणि श्री महासरस्वती या आदिशक्तीच्या त्रिदेवी स्वरूपाचे पवित्र अधिष्ठान श्री महालक्ष्मी मंदिरात आहे. शक्ती, बुद्धी आणि धनधान्य देणाऱ्या मातांची रूपे वेगवेगळी आहेत आणि लहान मुलींमध्येच ही रूपे दिसतात. कन्या हे देवीचे स्वरूप असते. मात्र, मुलींनी केवळ पूजेपुरते मर्यादित न राहता प्रत्येक क्षेत्रात धैर्याने काम करायला हवे. त्यांनी खूप शिकून मोठे व्हायला हवे, तरच खऱ्या अर्थाने देवी प्रसन्न होईल.

You may have missed