Pune Navratri Mahotsav | 32 व्या पुणे नवरात्रौ महोत्सवात रविवारी 12 तासांचा ‘लावणी महोत्सव’
पुणे : Pune Navratri Mahotsav | महाराष्ट्राची लोककला जतन करणारा आणि संपूर्ण महाराष्ट्राचे आकर्षण ठरलेला ३२ वा पुणे नवरात्रौ महोत्सव आयोजित ‘लावणी महोत्सव’ रविवार, दि. १८ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ ते रात्री १२ या वेळेत श्री गणेश कला-क्रीडा रंगमंच येथे संपन्न होणार आहे. महाराष्ट्रातील नामवंत लावणी कलावंतांचे विविध ग्रुप या महोत्सवात सहभागी होणार आहेत. यावेळी ज्येष्ठ अभिनेत्री आणि लावणीसम्राज्ञी मधू कांबीकर यांना सर्व लावणी कलावंतांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे.
सलग १२ तास चालणाऱ्या या लावणी महोत्सवात रोशनी मुंबईकर, वृषाली सातपुते, पूनम कुडाळकर, काव्य पुणेकर, रेश्मा, वर्षा परितेकर, मृणाल शेळके, शलाका पुणेकर, सोनाली शिंदे, कीर्ती देशमुख, सारिका नगरकर आणि त्यांचे सहकलावंत लावणी सादर करणार आहेत.
हा लावणी महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य खुला असून, रसिक प्रेक्षकांनी या महोत्सवाचा आवर्जून लाभ घ्यावा. महिलांसाठीदेखील बसण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक-अध्यक्ष आबा बागुल यांनी दिली.
