Pune Fire News : लक्ष्मीपुजनाला शहरात 94 आगीच्या घटना; गतवर्षीपेक्षा दुप्पटीहून अधिक घटना, सुदैवाने कोणी जखमी नाही

Pune Fire News: 94 fire incidents in the city during Lakshmi Puja; more than double than last year, fortunately no one was injured

पुणे : Pune Fire News | पर्यावरणाची काळजी घेण्याचे संदेश देऊन फटाक्यांचा मर्यादित वापर करण्याचे आवाहन करण्यात आले असले तरी पुणेकरांनी रविवारी जोरदार आतिषबाजी करत लक्ष्मीपूजन धडाक्यात साजरे केले. दिवसभरात पुणे शहरात प्रामुख्याने फटाक्यांमुळे ९४ आगीच्या घटना घडल्या. गतवर्षी लक्ष्मी पुजनाच्या वेळी ४३ आगीच्या घटना घडल्या होत्या़ तर २०२४ मध्ये ६० आगीच्या घटना घडल्या होत्या. हे पाहता या वर्षी फटाक्यांचा आवाजही जास्त होता तर, आगीच्या घटना दुप्पटीहून अधिक झाल्या आहेत. रात्री ८ ते १० दरम्यान सर्वाधिक फटाक्यांची आतीशबाजी झाली. याच काळात आगीच्या घटनाही अधिक दिसून आल्या. धुरामुळे आकाश काळे धुरांचे ढग तयार झाल्याचा भास दिसून येत होता.

दुपारी ३ वाजून १४ मिनिटांनी आगीची पहिली वर्दी अग्निशमन दलाकडे आली. त्यानंतर आज सकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी शेवटची गुजरवाडी येथील थोपटेनगरमधील कंपनीत आग लागली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी जाऊन आगी विझविल्या.

  • ०३.१४ – कोंढवा, कडनगर चौक येथील पडीक इमारतीच्या बेसमेंटमधील साहित्याला आग
  • ०४.३१ – धायरी, डिएसके विश्व येथे मोकळ्या मैदानात गवताला आग
  • ०५.४० – शिवाजीनगर, शिरोळे रोड झाडाला आग
  • ०६.२६ – काशेवाडी, हरकानगर कचरा आग
  • ०६़५१ – येरवडा क्षेञिय कार्यालयाजवळ आग
  • ०७.२३ – सदाशिव पेठ, नागनाथ पार गॅलरीमध्ये आग
  • ०७.३७ – वडगाव बुद्रुक झाडाला आग
  • ०७.४३ – काञज, गोकुळ नगर घराच्या पझ्यावर आग
  • ०७.४४ – सातारा रोड, सिटीप्राईड समोर कचरा आग
  • ०७.५९ – फुरसुंगी येथील गोडाऊनमध्ये आग
  • ०८.०० – सिंहगड रोड, गोयल गंगा गॅलरीमध्ये आग
  • ०८.०८ – कोथरूड, कृष्णा हॉस्पिटल जवळ गॅलरीत आग
  • ०८.१३ – नाना पेठ घरामध्ये आग
  • ०८.१६ – भवानी पेठ, छतावर ताडपञी आग
  • ०८.१९ – खराडी, बिडी- कामगार वसाहत टेरेसवर आग
  • ०८.३३ – काञज कोंढवा रोड, कृष्ण सागर हॉटेल समोर झाडाला आग
  • ०८.३८ – टिंगरे नगर, लेन नंबर ७ बी येथे झाडाला आग
  • ०८. ४२ – शुक्रवार पेठ, शिंदे आळी येथे घरामध्ये आग
  • ०८.४२ – खराडी, मुंढवा पुलापुढे इमारतीत फ्लॅटला आग
  • ०८.४४ – गंज पेठ, मिठगंज पोलिस चौकीजवळ घरामध्ये आग
  • ०८.५४ – सातारा रोड, सिटीप्राईड, सोनावणे इंडस्ट्रीज येथे दुकानाला आग
  • ०८.५६ – खराडी, एचपी पेट्रोल पंपामागे एका इमारतीत फ्लॅटला आग
  • ०८.५७ – पाषाण, सोमेश्वर वाडी येथे मोकळ्या मैदानात गवताला आग
  • ०८.५८ – वारजे, आरएमडी कॉलेज जवळ घरामध्ये आग
  • ०९.०० – गंज पेठ टेरेसवर आग
  • ०९.०३ – कोथरूड, पौड रोड घरामध्ये आग
  • ०९. १० – एनडीए चौक, किसकिंदा नगर घरामध्ये आग
  • ०९.१० – कल्याणी नगर, मारी गोल्ड सोसायटीत केबलला आग
  • ०९़१५ – टिंगरे नगर, लेन नंबर १० झाडाला आग
  • ०९.१५ – बालेवाडी मेट्रो स्टेशन जवळ मोकळ्या जागेत आग
  • ०९.१५ – कोंढवा बुद्रुक झाडाला आग
  • ०९.१८ – औंध, मेडीपॉंईट झाडाला आग
  • ०९.१९ – कर्वेनगर, वेदांत नगरी गवताला आग
  • ०९.२० – धनकवडी, सरस्वती नगर झाडाला आग
  • ०९.२५ – विमान नगर, एअरपोर्ट रोड इमारतीत फ्लॅटमध्ये आग
  • ०९.२८ – बाणेर, कळंबकर चौक येथे गॅलरीत आग
  • ०९.३० – बी टी कवडे रोड, सॅपरॉन हॉटेल समोर झाडाला आग
  • ०९.३१ – शिवाजीनगर भोसले नगर कचरा आग
  • ०९.३३ – धायरी, नरहे रोड झाडाला आग
  • ०९.३३ – कोथरूड, न्यु इंडिया स्कूल गवताला आग
  • ०९.३७ – दगडुशेठ मंदिर, समाधान चौक दुकानात आग
  • ०९.३८ – केशव नगर, लोणकर चौक फ्लॅटमध्ये आग
  • ०९.४० – रेंजहिल्स चौक – घरामध्ये आग
  • ०९.४३ – कोथरूड, निरंजन सोसायटीत झाडाला आग
  • ०९.४३ – कोंढवा, इस्कॉन मंदिर जवळ फ्लॅटमध्ये आग
  • ०९.४९ – उंड्री, बिशप स्कुलमागे घरात आग
  • ०९.५० – सिंहगड रोड, माणिक बाग गाडीला आग
  • ०९.५५ – रास्ता पेठ, शशिकांत डेअरी जवळ घरामध्ये आग
  • ०९.५५ – धानोरी रोड, लोकप्रिय नगरी घराला आग
  • १०.०२ – एनडीए रोड घरामध्ये आग
  • १०.०२ – धायरी, रायकर मळा गाडीला आग
  • १०.१० – औंध, आंबेडकर वसाहत कचरा आग
  • १०.१३ – कोथरूड, एकलव्य कॉलेज झाडाला आग
  • १०.१३ – कोथरूड, डिपी रोड झाडाला आग
  • १०.१८ – अप्पर इंदिरानगर गवताला आग
  • १०.२३ – जनता वसाहत कचरा आग
  • १०.२५ – पाषाण सर्कल समोर गवताला आग
  • १०.२५ – मांजरी बुद्रुक ऊसाला आग
  • १०.२६ – दौलत नगर हायवे जवळ गवताला आग
  • १०.२९ – महंमदवाडी झाडाला आग
  • १०.३६ – कोथरूड, आयडियल कॉलनी गच्चीवर आग
  • १०.३७ – काञज, वंडर सिटी गच्चीवर आग
  • १०.४६ – काञज आंबेगाव गोडाऊन आग
  • १०.४८ – मंगळवार पेठ, वजन काटा दुकानात आग
  • १०.५७ – खराडी गाव घरात आग
  • ११.१२ – औंध गाव इलेक्ट्रिक डीपी आग
  • ११.२० – कोरेगाव पार्क, लिबर्टी सोसायटीत गच्चीवर आग
  • ११.३५ – खराडी गाव दुकानात आग
  • ११.३७ – वारजे कॅनोल रोड गोडाऊन आग
  • ११.३९ – कोंढवा, लुल्लानगर फ्लॅटमध्ये आग
  • ११.४८ – शुक्रवार पेठ, राष्ट्रभुषण चौक गॅलरीत आग
  • ११.५४ – आंबेगाव बुद्रुक, शिवसृष्टी मागे कचरा आग
  • ११.५६ – बालेवाडी स्टेडियममागे कचरा आग
  • १२.०१ – विमान नगर, रोहन मिथिला सोसायटी गवताला आग
  • १२.०२ – हडपसर, तुकाई दर्शन कचरा आग
  • १२.१४ – कोंढवा खुर्द भाजी मंडई टपरीला आग
  • १२.३८ – नवले पुलाजवळ कचरा आग
  • १२.४१ – धायरी, हॉटेल मुरली गवताला आग
  • १२.४४ – येरवडा भाजी मंडई कचरा आग
  • १२.५२ – अप्पा बळवंत चौक झाडाला आग
  • ०१.०० – सहकार नगर, शिंदे गार्डन गवताला आग
  • ०१.११- धानोरी, परांडेनगर कचरा आग
  • ०१.१३ -धायरी लेन न २० गवताला आग
  • ०१.१७- कोंढवा बुद्रूक कचरा आग
  • ०१.२६ – मच्छी मार्किट जवळ आग
  • ०१.४८ – कोंढवा खुर्द महम्मदवाडी कचरा आग
  • ०२.०८ – कात्रज, जैन मंदिर दुगड शाळा शेडला आग
  • ०२.४९ – सिंहगड रोड माणिकबाग ब्रम्हा हाटेल समोर दुकानाला आग
  • ०३.०८ – गणेश पेठ मच्छी मार्केट बेसमेंट मध्ये आग
  • ४.१७ – बोट क्लब रोड घराला आग
  • ५.५० – सनसिटी, माणिकबाग झाडाला आग
  • ६.०५ – नाना पेठ, किराड हॉस्पिटल, उसाच्या गुराळाला आग
  • ६.२४ – वारजे माळवाडी, एनडीए रोड दुकानाला आग
  • ६.४५ – गुजरवाडी थोपटेनगर कंपनीत आग

You may have missed