Pune Crime News | कोंढवा बुद्रूकमध्ये दोन सोसायट्यांतील आठ सदनिका फोडल्या, सोन्या-चांदीचे दागिने चोरीला

Pune Crime News

Pune Crime News | पुण्यातील कोंढवा बुद्रूकच्या टिळेकरनगर परिसरात दोन गृहनिर्माण सोसायट्यांमधील आठ बंद सदनिकांची कुलपे तोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि इतर ऐवज चोरून नेला. ही घटना १२ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री टिळेकरनगर भाग एकमधील आयुष हाईट्स ‘बी’ आणि अमृता होम्स या सोसायट्यांमध्ये घडली.

याप्रकरणी नीलेश चंद्रकांत टकले (वय ३६, रा. ओम हाईट्स, टिळेकरनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून येवलेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोंढवा-येवलेवाडी, उंड्री आणि पिसोळी परिसरात घरफोडीच्या घटना वाढत असल्याचे सांगत रहिवाशांनी पोलिस गस्त वाढवण्याची मागणी केली आहे.

You may have missed