Pune Crime News | सिंहगड रोड भागात दहशत माजविणारे 3 सराईत तडीपार
पुणे: Pune Crime News | सिंहगड रोड परिसरात दहशत माजविणाऱ्या ३ सराईतांना पुणे शहर आणि जिल्ह्यातून तडीपार करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त डॉ. सागर कवडे यांनी दिले.
मंदार श्रीधर दारवटकर Mandar Shridhar Darvatkar (वय ३० रा. राजवर्धन सोसायटी, वडगाव बुद्रुक, सिंहगड रोड), आकाश सुभाष गाडे Akash Subhash Gade (वय २९), सागर मोहन राठोड Sagar Mohan Rathod (वय २३, दोघे रा. श्रीरामनगर, ब्रह्मा हॉटेलशेजारी, सिंहगड रोड) अशी तडीपार केलेल्यांची नावे आहेत. दारवटकर, गाडे, राठोड हे सराईत गुन्हेगार असून, त्यांच्याविरुद्ध गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहे.
तिघांनी टोळी तयार करुन गुन्हे केले होते. तिघांना पुणे शहर, जिल्हा, तसेच पिंपरी-चिंचवड शहरातून तडीपार करण्याचा प्रस्ताव पोलिसांनी तयार केला होता. या प्रस्तावाला मंजूरी देऊन पोलीस उपायुक्त डॉ . सागर कवडे यांनी तिघांना सहा महिन्यांसाठी तडीपार करण्याचे आदेश दिले.
ही कारवाई पोलीस उपायुक्त सागर कवडे, सहायक पोलीस आयुक्त विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर, पोलीस निरीक्षक समीर गायकवा़ड, पोलीस उपनिरीक्षक भूपेश साळुंके, पोलीस अंमलदार पंकज देशमुख, अरविंद धावडे, अश्विनी त्रिभूवन यांनी केली.
