Creative Foundation Pune | क्रिएटिव्ह फाउंडेशन तर्फे विविध संस्थांना दिलेल्या मदतीतून माझा वाढदिवस सार्थकी – मा. ना. मुरलीधर मोहोळ

Creative Foundation Pune | My birthday was meaningful through the help given by Creative Foundation to various institutions - Hon. Murli Dhar Mohol

ऑल आर्टिस्ट फाउंडेशन, नवचैतन्य हास्ययोग परिवार व इतर संस्थांना उपयुक्त साहित्य भेट – संदीप खर्डेकर

Creative Foundation Pune | क्रिएटिव्ह फाउंडेशन तर्फे विविध संस्थांना दिलेल्या मदतीतून माझा वाढदिवस सार्थकी झाला असे मी मानतो असे गौरवोदगार मा. ना. मुरलीधर मोहोळ यांनी काढले. माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान शिबीर किंवा दुष्काळ ग्रस्तांना व गरजुंना मदत करण्याचे मी आवाहन केले होते, त्यास अनुसरून सर्वांनीच समाजोपयोगी उपक्रम राबविले याचे समाधान वाटते असेही ना.मुरलीधरअण्णा मोहोळ म्हणाले.यावेळी क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर, विश्वस्त व नगरसेविका सौ. मंजुश्री खर्डेकर, ऑल आर्टिस्ट फाउंडेशन चे अध्यक्ष योगेश सुपेकर, पदाधिकारी रशीद शेख,गणेश गायकवाड, गणेश मोरे,मनोज माजिरे, सोमनाथ फाटके, अश्विनी कुरपे, भाविका कुलकर्णी यासह नव चैतन्य हास्ययोग परिवाराचे मकरंद टिल्लू, जयंत दशपुत्रे इ मान्यवर उपस्थित होते.

क्रिएटिव्ह फाउंडेशन तर्फे ना. मुरलीधर मोहोळ यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ( ९ नोव्हेंबर ) ९ दिवस नऊ संस्थांना विविध लोकोपयोगी साहित्य भेट देण्यात आले. या कार्यक्रमाची सांगता ऑल आर्टिस्ट फाउंडेशन व नवचैतन्य हास्ययोग परिवार ह्या संस्थांना ना. मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते वॉटर डिस्पेन्सर, वॉटर कुलर, स्पीकर सेट भेट देऊन करण्यात आली त्या वेळी ते बोलत होते.

क्रिएटिव्ह फाउंडेशन ने ना. मुरलीधर मोहोळ यांनी केलेल्या आवाहनानुसार उमेद फाउंडेशन ( विशेष मुलांसाठी चा बालक पालक प्रकल्प ) चे संस्थापक राकेश सणस यांना चार कपाटे, स्वामीकृपा वृद्धाश्रम चे संचालक विकास देडगे यांना स्पीकर सेट, पीएमपीएमएल स्वारगेट डेपो च्या श्री. दत्त मंदिर प्रतिष्ठान चे उमेश भाऊ दाभेकर, गणेश परदेशी, दिलीप उंद्रे,संजय राऊत,संतोष कोळी,प्रमोद गायकवाड, विकास जाधव यांना कपाट तर डहाणूकर कॉलोनी हॅप्पी कॉलोनी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष डॉ. अमृतकर, शांताराम वाणी, दत्तात्रय घाटे यांना कपाट व खुर्च्या,ज्येष्ठ नागरिक संघ वारजे माळवाडी चे गोपाळ कुलकर्णी,श्री. ठेकेदार, श्री. महाजन यांना खुर्च्या, मनमोहन सोसायटी ला कपाट व इतर संस्थांना उपयुक्त साहित्य क्रिएटिव्ह फाउंडेशन तर्फे भेट देण्यात आले असे फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी सांगितले.

वास्तविक पाहता ना. मुरलीधर मोहोळ यांच्या आवाहनाला प्रतिसाद देताना आम्हालाच आनंद होतं असल्याचे मत नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी व्यक्त केले.

यापुढील काळात ही विविध सण, उत्सव, महापुरुषांच्या जयंत्या, नेत्यांचे वाढदिवस अश्याच लोकोपयोगी साहित्य वाटपातून साजरे करण्यात येतील असे संदीप खर्डेकर यांनी जाहीर केले.

You may have missed