Pune Crime News | सराईत गुन्हेगारावर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केली एमपीडीए कायद्यान्वये कारवाई; नागपूर कारागृहात केले स्थानबद्ध
पुणे : Pune Crime News | औंध परिसरात दहशत माजविणाऱ्या सराईत गुहेगारावर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी एम पी डी ए कायद्यान्वये कारवाई केली असून त्याला एक वर्षासाठी नागपूर कारागृहात स्थानबद्ध केले आहे.
मोहन अरुण अडागळे Mohan Arun Adagale (वय २१, रा. विधाते वस्ती, दत्तनगर, जयगणेश कॉलनी, औंध) असे या गुंडाचे नाव आहे.
मोहन अडागळे याने साथीदारांसह चतु:शृंगी पोलीस ठाण्याच्या परिसरात खुनाचा प्रयत्न, दरोडा, घातक हत्यार बाळगणे, यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत. मागील ४ वर्षात त्याच्याविरुद्ध ६ गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारीमुळे या परिसरात सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली आहे. चतु:शृंगी पोलिसांनी एम पी डी ए कायद्यान्वये कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे पाठवला होता.
या प्रस्तावाची पडताळणी करून मोहन अरुण अडागळे याला नागपूर कारागृहात एक वर्ष स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त चिलुमुला रजनीकांत, सहायक पोलीस आयुक्त ब्रम्हदेव गावडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे, पोलीस निरीक्षक शीतल जाधव, सहायक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे, पोलीस उपनिरीक्षक उमेश कोळी, महिला पोलीस हवालदार जाधव, अजित गायकवाड, बाबू शिर्के, दहातोंडे, तांदळे, पोल्स अंमलदार संदीप ठोसर, सूर्यकांत मानकुबरे, वाघेश कांबळे, योगेश बडगे यांनी केली आहे.
