Pune Crime News | मोक्का गुन्ह्यात 7 महिने फरार सराईत गुंडाला गुन्हे शाखेच्या युनिट 3 च्या पथकाने केळे जेरबंद

Pune Crime News | Team 3 of the crime branch caught a notorious gangster who was on the run for 7 months in a minor crime

पुणे : Pune Crime News | वारजे परिसरात हत्याराने तरुणावर वार करून दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्यावर मोक्का कारवाई केल्यानंतर गेली ७ महिने फरार असलेल्या गुंडाला गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या पथकाने जेरबंद केले आहे.

मनीष शांताराम गंगावणे Manish Shantaram Gangawane (वय ३०, रा. वारजे माळवाडी) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. वारजे पोलीस ठाण्यात मनीष गंगावणे याच्या विरुद्ध मारहाण करून जखमी केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात पोलिसांनी मोक्का कारवाई केली होती. गेल्या ७ महिन्यांपासून तो फरार होता. गुन्हे शाखेचे युनिट ३ चे  पथक सिंहगड रोड परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी पोलीस हवालदार किशोर शिंदे, कैलास लीमण, योगेश झेंडे यांना माहिती मिळाली कि, मनीष गंगावणे हा डेक्कन येथील चौपाटीवर आला आहे. या माहितीची खातरजमा करून पोलीस पथकाने त्याचा शोध सुरु केला. तेव्हा तो शेलारमामा चौकाजवळ  बीड अंडा राईस हॉटेलच्या मागे बसलेला आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी कोथरूड सहायक पोलीस आयुक्त सुजाता तानवडे यांच्या ताब्यात दिले आहे.

ही कारवाई पोलीस उपायुक्त गौहर हसन, सहायक पोलीस आयुक्त शैलेश संखे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे, पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर श्रेणी पोलीस उप निरीक्षक पंढरीनाथ शिंदे, पोलीस हवालदार किशोर शिंदे. कैलास लीमण, योगेश झेंडे, अतुल साठे, विपुल गायकवाड, पुरुषोत्तम गुल्ला, तुषार किंद्रे, आशिष राठोड यांनी केली आहे.

You may have missed