Pune Crime News | पोलीस असल्याची बतावणी ज्येष्ठाकडील पाच लाखांचे दागिने घेतले काढून, पौड रोडवरील भर दिवसाची घटना

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | वाहतूक पोलीस असल्याची बतावणी करुन ज्येष्ठ नागरिकाकडील ५ लाख २० हजार रुपयांचे दागिने चोरुन नेल्याची घटना समोर आली आहे.

याबाबत एका ६२ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना पौड रोडवरील पेट्रा बिल्डींग, एच डी एफ सी बँके समोरील रोडवर १८ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे कोथरूडमधील भुसारी कॉलनीत राहायला आहेत. ते बुधवारी दुपारी  पौड फाटा चौकातून निघाले होते. काही अंतरावर दोघा चोरट्यांनी त्यांना अडविले. साध्या वेशातील त्यांनी  वाहतूक पोलीस असल्याची बतावणी केली. सिग्नल तोडला  असल्याचे सांगून चोरट्याने दंडात्मक  कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांना सांगितले. त्यानंतर त्यांनी आपल्या हातातील सोन्याची अंगठी व गळ्यातील चैन असा ५ लाख २० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने काढून दिले. हे दागिने घेऊन चोरटे पसार झाले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे फिर्याद  दिली. आपण हे दागिने कसे काढून दिले हे या नागरिकाच्या लक्षात आले नाही.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण घोडके यांनी घटनास्थळी भेट दिली.  सहायक पोलीस निरीक्षक सुप्रिया जगताप तपास करत आहेत.

You may have missed