API Vaishali Totewar-PSI Manoj Barure Suspended | एकाच दिवशी 2 लाचखोर पोलीस अधिकारी निलंबित ! एपीआय वैशाली तोटेवार, पीएसआय मनोज बरुरे यांचा समावेश

API Vaishali Totewar-PSI Manoj Barure Suspended | 2 corrupt police officers suspended on the same day! API Vaishali Totewar, PSI Manoj Barure included

पुणे : API Vaishali Totewar-PSI Manoj Barure Suspended |  एका पाठोपाठ सलग दोन दिवस लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने शहर पोलीस दलात कारवाई करुन दोघा पोलीस अधिकार्‍यांना लाच घेताना पकडल्याने त्यांना शहर पोलीस दलातून निलंबित केले आहे.

सहायक पोलीस निरीक्षक वैशाली मुरलीधर तोटेवार आणि पोलीस उपनिरीक्षक मनोज मधुकर बरुरे अशी निलंबित केलेल्या पोलीस अधिकार्‍यांची नावे आहेत. (API Vaishali Totewar Suspended)

सहायक पोलीस निरीक्षक वैशाली तोटेवार या आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असताना त्यांची पोलीस निरीक्षक म्हणून बढतीवर लोहमार्ग, मुंबई येथे बदली झाली होती. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी त्यांना कार्यमुक्त करण्याचा आदेश काढला होता. परंतु, तांत्रिक बाबी पूर्ण झाल्या नव्हत्या. त्यांच्याकडे असलेल्या एका तक्रार अर्जाच्या चौकशीत त्यांनी अगोदर २ लाख रुपयांची लाच स्वीकारली होती. त्यानंतर त्यांनी तक्रारदाराकडे आणखी ३० लाखांची मागणी केली होती. खासगी व्यक्ती संभाजी चव्हाण याच्या मार्फत २८ लाख रुपये स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले. त्यानंतर वैशाली तोटेवार हिलाही अटक करण्यात आली होती. (PSI Manoj Barure Suspended)

वैशाली तोटेवार हिला १ मे रोजी पोलीस निरीक्षक, लोहमार्ग, मुंबई या पदावर रुजू होण्यासाठी पदोन्नतीवर कार्यमुक्त करण्यात आल्यानंतर त्यांच्याकडे पूर्वी तपास असलेल्या प्रकरणाशी संबंधित तक्रारदाराशी संपर्क करुन त्याच्याकडे खासगी व्यक्तीला पाठविले. यावरुन तुमची बेईमानी वृत्ती दिसून येते, त्यामुळे पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी वैशाली तोटेवार हिला निलंबित केले आहे.

एका १७ वर्षाच्या मुलावर लोहगाव पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल होता. पोलीस उपनिरीक्षक मनोज बरुरे याने त्यांच्याकडे ८० हजार रुपयांची लाच मागितली होती. लोहगाव पोलीस ठाण्यात ८० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने मनोज बरुरे याला रंगेहाथ पकडले होते.

कर्तव्य बजावत असताना केलेल्या अत्यंत गंभीर, भ्रष्टाचारी व नैतिक अध:पतनाने पोलीस खात्याची प्रतिमा मलीन होईल, असे अशोभनीय गंभीर गैरवर्तनामुळे अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी पोलीस उपनिरीक्षक मनोज बरुरे याला निलंबित केले आहे.

लागोपाठ दोन दिवस दोघा पोलीस अधिकाऱ्यांवर लाच घेताना पकडले जाण्याचे व त्यांना एकाच दिवशी निलंबित केले जाण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे़

You may have missed