Bank Holiday In June | जून महिन्यात तब्बल 11 दिवस बँका राहणार बंद; बँकेत जाण्यापूर्वी जाणून घ्या सुट्ट्यांचे संपूर्ण वेळापत्रक

Bank Holiday In June | Banks will remain closed for 11 days in June; Know the complete schedule of holidays before going to the bank

मुंबई :  Bank Holiday In June | जून २०२६ या नवीन महिन्यात देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये आणि शहरांमध्ये साप्ताहिक सुट्ट्यांसह विविध सणांमुळे बँका एकूण ११ दिवस बंद राहणार आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या अधिकृत सुट्ट्यांच्या यादीनुसार यामध्ये शनिवार, रविवारच्या साप्ताहिक सुट्ट्या आणि स्थानिक सणांच्या सुट्ट्यांचा समावेश आहे. या प्रादेशिक सुट्ट्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये तिथल्या सणांनुसार लागू होणार असल्याने नागरिकांनी आपल्या बँकेच्या कामांचे नियोजन आधीच करून ठेवणे गरजेचे आहे.

या सुट्ट्यांमध्ये ७, १४, २१ आणि २८ जून रोजी येणाऱ्या चार रविवारच्या सुट्ट्यांचा समावेश आहे, तर १३ जून रोजी दुसरा शनिवार आणि २७ जून रोजी चौथा शनिवार असल्याने या दिवशी देशभरातील बँका बंद राहतील. साप्ताहिक सुट्ट्यांव्यतिरिक्त १५ जून रोजी यमुना दिन  आणि ‘राजा संक्रांती’ निमित्त अनुक्रमे आयझॉल आणि भुवनेश्वरमध्ये बँकांना सुट्टी असेल. पुढे २५ जून रोजी विजयवाडा येथे मोहरमची सुट्टी दिली गेली आहे, तर २६ जून रोजी मोहरम निमित्त देशातील बहुतांश शहरांमध्ये बँका बंद राहतील. मात्र, २६ जूनला महाराष्ट्र, अहमदाबाद, भुवनेश्वर, चंदीगड, जयपूर आणि पणजी यांसारख्या मोजक्या शहरांमध्ये बँकांचे कामकाज नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे. यानंतर २९ जून रोजी संत कबीर जयंतीनिमित्त शिमल्यात आणि ३० जून रोजी ‘रेम्ना नी’ निमित्त आयझॉलमध्ये बँका बंद राहतील.

बँकांच्या या सुट्ट्यांच्या काळात सामान्य नागरिकांना प्रत्यक्ष शाखेत जाऊन पैसे काढणे किंवा इतर कामे करता येणार नसली, तरी डिजिटल सेवांमुळे मोठा दिलासा मिळणार आहे. सुट्ट्यांच्या या ११ दिवसांमध्येही एटीएम सेवा, ऑनलाईन बँकिंग, मोबाईल बँकिंग आणि नेट बँकिंग या सुविधा २४ तास अखंडपणे सुरू राहतील. त्यामुळे ग्राहकांना पैशांची देवाणघेवाण किंवा इतर डिजिटल व्यवहार करताना कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागणार नाही.

You may have missed