Bhau Rangari Ganpati | पुणे : मंजुश्री खर्डेकर, संदीप खर्डेकर आणि कल्याणी खर्डेकर यांनी घेतले श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे दर्शन

Bhau Rangari Ganpati | Pune: Manjushree Khardekar, Sandeep Khardekar and Kalyani Khardekar took darshan of Shrimant Bhausaheb Rangari Ganapati.

पुणे : Bhau Rangari Ganpati | वारजे-कर्वेनगर प्रभाग समितीच्या अध्यक्षा तथा नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, भाजपा नेते संदीप खर्डेकर आणि कोथरूड मंडल भाजपा महिला मोर्चाच्या सरचिटणीस सौ. कल्याणी प्रतीक खर्डेकर यांनी आज श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे मनोभावे दर्शन घेत आरती केली.

हिंदुस्थानातील पहिल्या सार्वजनिक गणपती मंडळांपैकी ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या दर्शनावेळी तिघांनीही गणरायाच्या चरणी प्रार्थना केली.

यावेळी ट्रस्टच्या वतीने पुनीत बालन यांनी मंजुश्री खर्डेकर, संदीप खर्डेकर आणि कल्याणी खर्डेकर यांचा गणपती बाप्पाची मूर्ती देऊन सन्मान केला.

You may have missed