Congress Protests in Pune | स्मार्ट मीटर सक्तीविरोधात पुण्यात काँग्रेसचे आंदोलन; एमएसईबी कार्यालयाबाहेर सरकारविरोधात घोषणाबाजी

Congress Protests in Pune | Congress protests in Pune against the mandatory installation of smart meters; slogans raised against the government outside the MSEB office.

पुणे : Congress Protests in Pune | स्मार्ट मीटरच्या सक्तीच्या विरोधात आणि एमएसईबीच्या जागेत अदानी कंपनीला कार्यालयासाठी जागा दिल्याच्या आरोपावरून पुण्यात काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पूर्व विभागाचे अध्यक्ष प्रशांत जगताप आणि पश्चिम विभागाच्या अध्यक्षा दिप्ती चवधरी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले.

रास्ता पेठ येथील एमएसईबीच्या मुख्य कार्यालयाबाहेर मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी एकत्र येत राज्य सरकारच्या धोरणांचा निषेध व्यक्त केला. यावेळी स्मार्ट मीटर योजनेचा पुनर्विचार करावा तसेच एमएसईबी कार्यालय परिसरातील अदानी कंपनीचे कार्यालय हटवावे, या मागण्यांचे निवेदन मुख्य अभियंत्यांना देण्यात आले.

या आंदोलनात नगरसेविका अश्विनी लांडगे, महिला अध्यक्षा स्वाती शिंदे यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. स्मार्ट मीटर योजनेमुळे सर्वसामान्य ग्राहकांवर आर्थिक भार पडणार असल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

यावेळी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी पूर्व विभागाचे अध्यक्ष प्रशांत जगताप, पश्चिम  विभागाच्या अध्यक्षा दिप्ती चवधरी यांच्या समवेत नगरसेविका अश्विनी लांडगे, महिला अध्यक्षा स्वाती शिंदे, मजहर मणियार , संगीता पवार, यशराज पारखी, भाऊसाहेब आजबे, द. स. पोळेकर, रमेश सोनकांबळे, सुरेश कांबळे, अविनाश अडसुळ, मजहर मणियार, सुनिल पंडित, संजय कवडे, दिपक ओव्‍हाळ, चेतन अगरवाल, सतिश पवार, अकबर शेख, वाल्मिक जगताप , दादाश्री कामठे, भगवान कडू, संतोष सुपेकर, अमित कांबळे, माऊली मोरे, पप्पु घोलप, आसिफ शेख, जुबेरबाबु शेख, आयुब पठाण, परवीन तांबोळी, जिनाद सय्यद आदींसह काँग्रेस पक्षाचे असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते व पुणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You may have missed