Jay Pawar Meet CID Officer | पुणे : अजित पवार विमान अपघाताचा तपास जलदगतीने पूर्ण करा! जय पवारांनी घेतली CID अधिकाऱ्यांची भेट; 9 महिन्यांनंतरही सत्य समोर येण्याची प्रतीक्षा

Jay Pawar Meets CID Officer | Pune: Ajit Pawar urges to complete the plane crash investigation quickly! Jay Pawar meets CID officers; still waiting for the truth to come out even after 9 months

पुणे : Jay Pawar Meet CID Officer |  दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या तपासाला गती देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते जय पवार यांनी केली आहे. बुधवारी (२८ ऑक्टोबर) पुण्यातील गुन्हे अन्वेषण विभागाच्या (CID) अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांनी तपासाच्या सद्यस्थितीचा सविस्तर आढावा घेतला.

या भेटीदरम्यान तपासात आतापर्यंत कोणती कार्यवाही झाली, कोणत्या बाबींची चौकशी अद्याप प्रलंबित आहे आणि संपूर्ण तपास पूर्ण होण्यासाठी आणखी किती कालावधी लागणार, याबाबत जय पवार यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. तपासात कोणतीही दिरंगाई न करता तो पारदर्शकपणे आणि जलदगतीने पूर्ण करण्याची मागणी त्यांनी केली.

२८ जानेवारी २०२६ रोजी बारामतीजवळ झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेला नऊ महिने पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर जय पवार यांनी सीआयडी अधिकाऱ्यांची भेट घेतली.

विमान अपघाताबाबत जनतेच्या मनात निर्माण झालेल्या विविध प्रश्नांची उत्तरे मिळणे आवश्यक असल्याचे जय पवार यांनी सांगितले. अपघाताशी संबंधित प्रत्येक महत्त्वाच्या बाबीची सखोल चौकशी व्हावी आणि काही गैरप्रकार आढळल्यास संबंधितांची जबाबदारी निश्चित करून योग्य कारवाई करण्यात यावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

“अजितदादांच्या विमान अपघातामागील सत्य समोर येणे हा केवळ एका कुटुंबाचा प्रश्न नसून, दादांवर प्रेम करणाऱ्या लाखो नागरिकांच्या विश्वासाचा विषय आहे,” अशी भूमिका जय पवार यांनी मांडली.

अपघातामागील संपूर्ण सत्य समोर येईपर्यंत या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा सुरूच ठेवणार असल्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

या वेळी आमदार विक्रम काकडे उपस्थित होते.

You may have missed