Sahakar Nagar Pune Accident | पुणे : सहकारनगर परिसरात वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

Pune Accident News

पुणे : Sahakar Nagar Pune Accident | सहकारनगर परिसरात भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत ५१ वर्षीय पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अपघातानंतर जखमी व्यक्तीला कोणतीही वैद्यकीय मदत न करता वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला.

विश्वनाथ महादू शिरसाठ (वय ५१, रा. शाहू वसाहत, लक्ष्मीनगर, पर्वती) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री एकच्या सुमारास शिरसाठ हे सहकारनगर क्रमांक दोन परिसरातील पाटे संस्कृती इमारतीजवळील रस्त्याने जात होते. त्याचवेळी अंधारात भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली.

अपघातानंतर वाहनचालकाने थांबून मदत करण्याऐवजी घटनास्थळावरून पळ काढला. गंभीर जखमी झालेल्या शिरसाठ यांना स्थानिक नागरिकांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

याप्रकरणी मृताचे पुतणे मंगेश शेखर कसबे (वय ४३) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पर्वती पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक राऊत करीत आहेत.

You may have missed