Police Officers Suspended In Pune-Pimpri | पुणे : विषारी दारू प्रकरणात हडपसरचे 3 तर दापोडीचे 6 पोलीस अधिकारी, कर्मचारी तडकाफडकी निलंबित; राज्य उत्पादन शुल्क विभागाची 13 अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई

Police Officers Suspended In Pune-Pimpri | Pune: 3 police officers and 6 police officers of Hadapsar and Dapodi suspended in poisonous liquor case; Action taken against 13 officers and employees of the State Excise Department

पुणे/पिंपरी : Police Officers Suspended In Pune-Pimpri | पुणे व पिंपरी चिंचवड शहरात विषारी दारू पिऊन १९ जणांचा मृत्यु झाला. या घटनेत हातभट्टी दारुची विक्री झालेल्या हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह तिघांना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी निलंबित केले आहे. पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दापोडी पोलीस ठाण्याच्या ६ पोलीस अधिकारी व अंमलदारांना निलंबित केले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने ३ निरीक्षक, ६ दुय्यम निरीक्षक आणि चार कर्मचार्‍यांना निलंबित केले आहे.

हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय मोगले, हडपसर पोलीस चौकीच्या सहायक पोलीस निरीक्षक हसिना सिकलगार आणि गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी यांना निलंबित करण्यात आले आहे.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील दापोडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक राजू भास्कर, पोलीस अंमलदार विशाल काळे, जयदीप सोनवणे, नवनाथ पोटे, सागर जाधव यांना निलंबित करण्यात आले आहे.                                                                                                          

हडपसर फुगेवाडी परिसरात विषारी दारूची विक्री केली गेल्याने त्यात हडपसर, फुगेवाडी परिसरातील १९ जणांचा मृत्य झाला़ या घटना पोलीस अधिकार्‍यांच्या निष्काळजीपणा व पर्यवेक्षणाचा अभाव यामुळे घडलेली आहे. या घटनेमुळे पोलीस दलाची प्रतिमा जनमानसात मलिन झाली. पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. त्यामुळे या पोलीस अधिकार्‍यांना निलंबित करण्यात आले आहे.

You may have missed